चंद्रपूर जिल्ह्यातील निवडणूक कार्यक्रम घोषित झाल्यापासून महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये कोण उमेदवार राहील याबाबत चर्चाना उधाण आले होते. तर आता महाविकास आघाडीतील काँग्रेसचे तीन विधानसभा मतदारसंघांतील उमेदवार घोषित झाल्याने चंद्रपूर जिल्ह्यातील सहाही विधानसभा क्षेत्रातील लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. त्यामुळे काँग्रेस विरुद्ध भाजप असा थेट सामना विधानसभा क्षेत्रात बघायला मिळणार आहे.
चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातून किशोर जोरगेवार (भाजप), प्रवीण पडवेकर (काँग्रेस)बल्लारपुर येथून,
सुधीर मुनगंटीवार (भाजप) संतोष रावत (काँग्रेस)ब्रम्हपुरी येथून विजय वडेट्टीवार (काँग्रेस) कृष्णा सहारे (भाजप)चिमूर येथून कीर्तिकुमार भांगडिया (भाजप) सतीश वारजुकर (काँग्रेस)राजुरा येथून सुभाष धोटे (काँग्रेस) देवराव भोंगळे (भाजप)आणि वरोरा येथून
प्रवीण काकडे (काँग्रेस) करण देवतळे (भाजप) हे उमेदवार ऊभे राहणार आहे.
महायुतीतील भाजपचे सहाही विधानसभा
क्षेत्रातील उमेदवार घोषित झाल्यानंतरही महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसने तीन विधानसभा क्षेत्रातील उमेदवार घोषित केले नव्हते. यामुळे सामान्य नागरिकांसह राजकीय नेत्यांचेही याकडे लक्ष लागले होते. सर्वाधिक चर्चेत असलेल्या बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातून संतोष रावत यांचे नाव जाहीर झाले आहे.
वरोरा विधानसभा क्षेत्रातून खासदार प्रतिभा धानोरकर यांचे बंधू प्रवीण काकडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातून तब्बल २६ इच्छुकांनी काँग्रेसकडून उमेदवारी मागितली होती. त्यामुळे यातील कोणाला उमेदवारी मिळेल याबाबत सर्वत्र चर्चा होती. प्रवीण पडवेकर यांच्या नावाची घोषणा झाल्याने आता पडवेकर विरुद्ध जोरगेवार अशी लढत होणार आहे.