Chandrapur

चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यात पहाडावरील शेतकरीवर्ग करतात कीटकनाशकांचा मोठ्या प्रमाणात वापर

जिवती : चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यात पहाडावरील शेतकरीवर्ग कीटकनाशकांचा वापर मोठ्या प्रमाणात करायला लागले आहेत.शेतीचे उत्पन्न वाढविण्याच्या नादात शेतकरी वर्ग नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करत असून सोबतच रासायनिक खतांचा वापर करत आहेत.यामुळे दिवसेंदिवस जमिनीच्या सुपीकतेवर परिणाम होऊन जमिनीचा दर्जा घसरत आहे आणि जमीन दिवसेंदिवस बंजर होत आहे.

मागील दहा वर्षांपूर्वी माणिकगड पहाडावरील शेतकरी शेती व्यवसायासोबत पशुपालनाकडे जोडधंदा म्हणून पाहत होते. पशुपालनात गाय, बैल, म्हैस, शेळ्या, मॅढ्या इत्यादी पाळत होते व दुग्धव्यवसायही करत होते. पशुपालन करत असल्यामुळे जनावरांची विष्ठा शेणखत म्हणून शेतीसाठी उपयोगी पडत होती.
शेणखतातून शेतीला मोठ्या प्रमाणावर पोषक तत्त्व मिळत होते. यामुळे जमिनीचा दर्जा वाढत होता. कोणतीही हानी होत नव्हती. शिवाय शेतकऱ्यांना निरोगी पिकातून पौष्टिक अन्न मिळत होते. तसेच उत्पादन दर्जात वाढ ही होत होती. खरीप आणि रब्बी हंगामात पिकांवर कोणत्याही रोगाचे आक्रमण झाले तर शेतकरी स्वतः उपाययोजना करीत होते. मात्र, आजघडीला ही पद्धत अपवादात्मक शेतकरी अवलंबत आहेत.

तेथील नागरिकांचा शेती हा मुख्य व्यवसाय आहे. त्यामुळे याचा परिणाम थेट शेतकऱ्यांना शेतीच्या उत्पादनावर होत आहे. तसेच रासायनिक खते व कीटकनाशक यांच्या वापरामुळे पिकाचा दर्जाही खालावत आहे. म्हणून आता पुन्हा सर्व शेतकरी बांधवांनी सेंद्रिय शेतीकडे वळणे काळाची गरज निर्माण झाली आहे.

आजघडीला परिस्थिती बदलली आहे. पिकाचे उत्पादन चांगले व्हावे व पीक चांगले राहावे म्हणून रासायनिक खत व कीटकनाशके यांचा बेसुमार वापर होत असल्याने परिणामी जमिनीतील आवश्यक पोषण तत्त्व नष्ट होत चालले आहेत. शेतीतून मिळणाऱ्या अन्नातही पोषण तत्त्वांचे प्रमाण अतिशय कमी दिसून येते. सध्या पिकांना रासायनिक खत व कीटकनाशके यांचा सर्रास वापरामुळे जमिनीच्या सुपीकतेवर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. वेळीच भविष्याचा होणारा धोका ओळखून सेंद्रिय शेती करणे काळाची गरज बनली आहे. यासाठी शेतकऱ्यांनीच पुढाकार घेण्याची गरज आहे.

Vidarbha Trends Team

Recent Posts

विकलांग बालकावर अत्याचार करणाऱ्यांना पाच वर्षाची शिक्षा

यवतमाळ :- मानसिक विकलांग बालकावर अत्याचार करणाऱ्या आरोपींना ५ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे,…

6 hours ago

मोबाईल बंदी असतांनाही मतदान कक्षात मोबाईल

बुलढाणा:- विधानसभा निवडणुकीत मोबाईल बंदी असतानाही नागरिकांनी मतदान कक्षात मोबाईल नेऊन व्हीव्हीपॅट वोटिंग मशीनच्या चित्रफिती…

7 hours ago

बाजारात सोयाबीनचे दर वाढेना

वाशिम:- वाशिम मधील बाजारात सोयाबीनचे दर निवडणुकीनंतर वाढतील अशी सर्व शेतकऱ्यांची आशा होती, पण निवडणुकीनंतर…

8 hours ago

दुचाकी घसरल्यामुळे एक जखमी तर एक ठार

अमरावती:- २१ नोव्हेंबर रोजी दुचाकी घसरल्यामुळे १ च्या सुमारास खेडनजीक गावातील अपघातात ६४ वर्षीय इसमाचा…

10 hours ago

सायबर फसवणुकी पासून सावधान

वर्धा:- सायबर फसवणुकीपासून सावधान रहा असे आवाहन जिल्हा पोलीस व सायबर सेल विभागाने केले आहे,…

11 hours ago

मजूर टंचाईमुळे शेतकऱ्यांना धान कापणीच्या कामात अडचणीं

चंद्रपूर (सास्ती) : राजुरा तालुका पांढऱ्या सोन्यासाठी प्रसिद्ध आहे.गेल्या काही आठवड्यांपासून जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये मजूर…

1 day ago

This website uses cookies.