चंद्रपूर :या जिल्ह्यातील तीन शासकीय आयटीआय चे नाव बदलल्याची माहिती समोर आली आहे. चंद्रपूर येथील मुलींच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला राणी दुर्गावती,पोंभुर्णा येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला भगवान बिरसा मुंडा तर बल्लारपूर येथील शासकीय औद्योगिक संस्थेला राणी हिराई यांचे नाव देण्यात आले आहे.
जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते आभासी पद्धतीने हा नामकरण सोहळा पार पडला. औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना शौर्याचे प्रतीक असलेल्या ,महान व्यक्तिमत्त्वांची नावे दिल्याने, भावी पिढीला तसेच तरुणांना प्रेरणा मिळेल, असा विश्वास मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.
राणी दुर्गावती, भगवान बिरसा मुंडा, राणी हिराई या तिनही महान व्यक्तिमत्त्वाचे नाव जिल्ह्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला देण्याची संधी मिळाली, हे आपले भाग्य असल्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
राज्य सरकारने हा निर्णय जाहीर केल्याने जिल्ह्यात सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे.
चंद्रपूर : या जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ८५ वर्षीय पूर्ण केलेल्या, तसेच ४० टक्के व…
गोंदिया : या जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. निवडणूक कालावधी पूर्ण होईपर्यंत कोणत्याही…
गडचिरोली : या जिल्ह्यात सेप्टिक टाक्यांची सफाई केल्याचे बिल काढून दिल्याबद्दल पोलिस अधीक्षक कार्यालयातील वरिष्ठ…
यवतमाळ :- यवतमाळ विधानसभा क्षेत्रामध्ये सकाळी ७ वाजता पासून १४ ते १६ नोव्हेंबर पर्यंत ८५…
वर्धा :- शिक्षकाने आईला म्हटले तुमची मुलगी अभ्यासात कच्ची आहे मी तिला दुसऱ्या बॅचमध्ये नेऊन…
अकोला:- शेतकऱ्यांनी रब्बी हंगाम लागल्यामुळे शेतात हरभरा, गहू, मका, बाजरी अशा अनेक पिकाची पेरणी केली…
This website uses cookies.