Send News on +91 - 92090 51524
More
    HomeChandrapurचंद्रपूर जिल्ह्यातील मतदारसंघातील उमेदवारांमध्ये कुठे बहुरंगी, तिरंगी तर कुठे सरळ लढतीचे चित्र...

    चंद्रपूर जिल्ह्यातील मतदारसंघातील उमेदवारांमध्ये कुठे बहुरंगी, तिरंगी तर कुठे सरळ लढतीचे चित्र स्पष्ट

    Published on

    spot_img

    चंद्रपूर : या जिल्ह्यामध्ये विधानसभा निवडणुकीच्या रिंगणातून १२० पैकी २५ जणांनी माघार घेतली आहे. सहाही विधानसभा मतदारसंघांमध्ये आता ९५ उमेदवार निवडणूक रिंगणात उरले आहेत. या उमेदवारांमध्ये कुठे बहुरंगी, तिरंगी तर कुठे सरळ लढतीचे चित्र निर्माण झाले आहे. यासोबतच आता प्रचाराचा धुरळाही उडणार आहे. यामध्ये कोण आघाडी घेतो, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे .

    राजुरा विधानसभा मतदारसंघात भाजपचे माजी आमदार अॅड. संजय धोटे आणि सुदर्शन निमकर यांनी बंडखोरी मागे घेतली आहे. आता विद्यमान आमदार व काँग्रेसचे उमेदवार सुभाष धोटे, भाजपचे देवराव भोंगळे आणि स्वतंत्र भारत पक्षाचे अॅड. वामनराव चटप यांच्यात लढतीचा सामना रंगणार आहे. या लढतीत वंचित बहुजन
    आघाडीचा पाठिंबा असलेले गोंडवाना गणतंत्र पार्टीचे उमेदवार गजानन जुमनाके यांच्या उमेदवारीने रंगत आणली आहे.

    बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात सांस्कृतिक कार्यमंत्री व भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांची लढत काँग्रेसचे उमेदवार संतोषसिंह रावत यांच्याशी होईल.

    तर उद्धवसेनेचे जिल्हाप्रमुख संदीप गिन्हे यांनी बंडखोरी माघार घेतली असली, तरी डॉ. अभिलाषा गावतुरे यांची बंडखोरी चुरस निर्माण करणारी ठरली आहे. चंद्रपूर विधानसभा मतदारसंघात अपक्ष आमदार असलेले भाजपचे उमेदवार किशोर जोरगेवार आणि काँग्रेसचे उमेदवार प्रवीण पडवेकर यांच्यात सरळ लढतीचे चित्र दिसत असले, तरी भाजपचे बंडखोर उमेदवार ब्रिजभूषण पाझारे यांच्या उमेदवारीने मतदारांमध्ये उत्सुकता आहे.

    वरोरा विधानसभा मतदारसंघातून भाजपचे रमेश राजूरकर यांनी आपले नामांकन परत घेतले आहे. येथे काँग्रेसचे उमेदवार प्रवीण काकडे आणि भाजपचे करण देवतळे यांच्यात खरी लढत होईल, असे दिसत असले, तरी या मतदारसंघात उद्धवसेनेचे जिल्हा प्रमुख मुकेश जीवतोडे यांची बंडखोरी रंगत आणणारी आहे. यातच काँग्रेसकडून इच्छुक असलेले डॉ. चेतन खुटमाटे हेही रिंगणात आहेत, तसेच दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांचे थोरले बंधू अनिल धानोरकर यांनी पक्षांतर करीत वंचित बहुजन आघाडीकडून ते मैदानात दंड थोपटून आहे. सोबतच भाजपचे अहेतेश्याम अली रिंगणात कायम असल्याने बहुरंगी लढतीचे चित्र निर्माण झाले आहे.

    चिमूर विधानसभेत विद्यमान आमदार भाजपचे उमेदवार कीर्तीकुमार भांगडिया आणि काँग्रेसचे डॉ. सतीश वारजूकर यांच्यात पारंपरिक सामना बघायला मिळणार आहे. वंचित बहुजन आघाडीचे दिवाकर सांदेकर यांच्यामुळे निवडणुकीची चुरस वाढली आहे. ब्रह्मपुरी विधानसभेत राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार आणि भाजपचे उमेदवार कृष्णलाल सहारे यांच्यात थेट लढतीचे चित्र आहे.

    Latest articles

    विकलांग बालकावर अत्याचार करणाऱ्यांना पाच वर्षाची शिक्षा

    यवतमाळ :- मानसिक विकलांग बालकावर अत्याचार करणाऱ्या आरोपींना ५ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली...

    मोबाईल बंदी असतांनाही मतदान कक्षात मोबाईल

    बुलढाणा:- विधानसभा निवडणुकीत मोबाईल बंदी असतानाही नागरिकांनी मतदान कक्षात मोबाईल नेऊन व्हीव्हीपॅट वोटिंग मशीनच्या...

    बाजारात सोयाबीनचे दर वाढेना

    वाशिम:- वाशिम मधील बाजारात सोयाबीनचे दर निवडणुकीनंतर वाढतील अशी सर्व शेतकऱ्यांची आशा होती, पण...

    दुचाकी घसरल्यामुळे एक जखमी तर एक ठार

    अमरावती:- २१ नोव्हेंबर रोजी दुचाकी घसरल्यामुळे १ च्या सुमारास खेडनजीक गावातील अपघातात ६४ वर्षीय...

    Read More Articles

    विकलांग बालकावर अत्याचार करणाऱ्यांना पाच वर्षाची शिक्षा

    यवतमाळ :- मानसिक विकलांग बालकावर अत्याचार करणाऱ्या आरोपींना ५ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली...

    मोबाईल बंदी असतांनाही मतदान कक्षात मोबाईल

    बुलढाणा:- विधानसभा निवडणुकीत मोबाईल बंदी असतानाही नागरिकांनी मतदान कक्षात मोबाईल नेऊन व्हीव्हीपॅट वोटिंग मशीनच्या...

    बाजारात सोयाबीनचे दर वाढेना

    वाशिम:- वाशिम मधील बाजारात सोयाबीनचे दर निवडणुकीनंतर वाढतील अशी सर्व शेतकऱ्यांची आशा होती, पण...