Chandrapur

चंद्रपूर जिल्ह्यातील मतदारसंघातील उमेदवारांमध्ये कुठे बहुरंगी, तिरंगी तर कुठे सरळ लढतीचे चित्र स्पष्ट

चंद्रपूर : या जिल्ह्यामध्ये विधानसभा निवडणुकीच्या रिंगणातून १२० पैकी २५ जणांनी माघार घेतली आहे. सहाही विधानसभा मतदारसंघांमध्ये आता ९५ उमेदवार निवडणूक रिंगणात उरले आहेत. या उमेदवारांमध्ये कुठे बहुरंगी, तिरंगी तर कुठे सरळ लढतीचे चित्र निर्माण झाले आहे. यासोबतच आता प्रचाराचा धुरळाही उडणार आहे. यामध्ये कोण आघाडी घेतो, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे .

राजुरा विधानसभा मतदारसंघात भाजपचे माजी आमदार अॅड. संजय धोटे आणि सुदर्शन निमकर यांनी बंडखोरी मागे घेतली आहे. आता विद्यमान आमदार व काँग्रेसचे उमेदवार सुभाष धोटे, भाजपचे देवराव भोंगळे आणि स्वतंत्र भारत पक्षाचे अॅड. वामनराव चटप यांच्यात लढतीचा सामना रंगणार आहे. या लढतीत वंचित बहुजन
आघाडीचा पाठिंबा असलेले गोंडवाना गणतंत्र पार्टीचे उमेदवार गजानन जुमनाके यांच्या उमेदवारीने रंगत आणली आहे.

बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात सांस्कृतिक कार्यमंत्री व भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांची लढत काँग्रेसचे उमेदवार संतोषसिंह रावत यांच्याशी होईल.

तर उद्धवसेनेचे जिल्हाप्रमुख संदीप गिन्हे यांनी बंडखोरी माघार घेतली असली, तरी डॉ. अभिलाषा गावतुरे यांची बंडखोरी चुरस निर्माण करणारी ठरली आहे. चंद्रपूर विधानसभा मतदारसंघात अपक्ष आमदार असलेले भाजपचे उमेदवार किशोर जोरगेवार आणि काँग्रेसचे उमेदवार प्रवीण पडवेकर यांच्यात सरळ लढतीचे चित्र दिसत असले, तरी भाजपचे बंडखोर उमेदवार ब्रिजभूषण पाझारे यांच्या उमेदवारीने मतदारांमध्ये उत्सुकता आहे.

वरोरा विधानसभा मतदारसंघातून भाजपचे रमेश राजूरकर यांनी आपले नामांकन परत घेतले आहे. येथे काँग्रेसचे उमेदवार प्रवीण काकडे आणि भाजपचे करण देवतळे यांच्यात खरी लढत होईल, असे दिसत असले, तरी या मतदारसंघात उद्धवसेनेचे जिल्हा प्रमुख मुकेश जीवतोडे यांची बंडखोरी रंगत आणणारी आहे. यातच काँग्रेसकडून इच्छुक असलेले डॉ. चेतन खुटमाटे हेही रिंगणात आहेत, तसेच दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांचे थोरले बंधू अनिल धानोरकर यांनी पक्षांतर करीत वंचित बहुजन आघाडीकडून ते मैदानात दंड थोपटून आहे. सोबतच भाजपचे अहेतेश्याम अली रिंगणात कायम असल्याने बहुरंगी लढतीचे चित्र निर्माण झाले आहे.

चिमूर विधानसभेत विद्यमान आमदार भाजपचे उमेदवार कीर्तीकुमार भांगडिया आणि काँग्रेसचे डॉ. सतीश वारजूकर यांच्यात पारंपरिक सामना बघायला मिळणार आहे. वंचित बहुजन आघाडीचे दिवाकर सांदेकर यांच्यामुळे निवडणुकीची चुरस वाढली आहे. ब्रह्मपुरी विधानसभेत राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार आणि भाजपचे उमेदवार कृष्णलाल सहारे यांच्यात थेट लढतीचे चित्र आहे.

Vidarbha Trends Team

Recent Posts

विधानसभा निवडणुकीसाठी ८५ वर्षीयपूर्ण केलेल्या, दिव्यांगत्व असलेल्या मतदारांसाठी सोय

चंद्रपूर : या जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ८५ वर्षीय पूर्ण केलेल्या, तसेच ४० टक्के व…

9 hours ago

ड्रोन कॅमेऱ्याच्या मदतीने पोलिस ठेवत आहेत नागरिकांवर लक्ष

गोंदिया : या जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. निवडणूक कालावधी पूर्ण होईपर्यंत कोणत्याही…

9 hours ago

लाच मागणाऱ्या वरिष्ठ श्रेणी लिपिकाला पोलिसांनी घेतले ताब्यात

गडचिरोली : या जिल्ह्यात सेप्टिक टाक्यांची सफाई केल्याचे बिल काढून दिल्याबद्दल पोलिस अधीक्षक कार्यालयातील वरिष्ठ…

9 hours ago

यवतमाळमध्ये सकाळी ७ वाजता पासून तीन दिवस मतदान प्रक्रिया

यवतमाळ :- यवतमाळ विधानसभा क्षेत्रामध्ये सकाळी ७ वाजता पासून १४ ते १६ नोव्हेंबर पर्यंत ८५…

13 hours ago

शिक्षकाने केला अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ

वर्धा :- शिक्षकाने आईला म्हटले तुमची मुलगी अभ्यासात कच्ची आहे मी तिला दुसऱ्या बॅचमध्ये नेऊन…

15 hours ago

हरभऱ्याच्या पिकात जंगली रानडुकरामुळे शेतात रात्रभर जागरण

अकोला:- शेतकऱ्यांनी रब्बी हंगाम लागल्यामुळे शेतात हरभरा, गहू, मका, बाजरी अशा अनेक पिकाची पेरणी केली…

16 hours ago

This website uses cookies.