मुल (चंद्रपूर):या जिल्ह्यातील मूल तालुक्यामध्ये रात्री एका बिबट्याने झोपून असलेल्या महिलेवर घरात घुसून हल्ला केला. मिळालेल्या माहितीनुसार वंदना परशुराम निमगडे (४८)असे जखमी महिलेचे नाव आहे .वंदना निमगडे या शिवापूर -चक या गावात राहतात.
निमगडे कुटुंब रात्री झोपून असताना, घराजवळ असलेल्या मोकाट कुत्र्यांनी बिबट्याला बघून भुंकणे सुरू केले.या कुत्र्यांचा भुंकण्याचा आवाज ऐकल्यामुळे , निमगडे कुटुंबीय जागे झाले.परंतु बिबट्याने वंदनावर झडप घालून हल्ला केला .
यामुळे घरच्यांनी घाबरून आरडाओरड सुरू केले ,आणि म्हणून बिबट्या तिथून पसार झाला.या घटनेची माहिती वनविभागाला देताच कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले .आणि त्यांनी पंचनामा केला.
त्यानंतर वंदना यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले .शिवापुर- चक या गावाभोवती संपूर्ण बफर झोनचे घनदाट जंगल आहे.त्यामुळे त्या परिसरात वन्यजीवांचा वावर मोठ्या प्रमाणात होतो .या घटनेमुळे गावातील नागरिक घाबरले असून, या बिबट्याचा बंदोबस्त लवकरात लवकर करावे, अशी मागणी तेथील गावकऱ्यांनी वनविभागाला केली आहे.