Chandrapur

चंद्रपूर जिल्ह्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पूर्वतयारीचा जिल्हानिहाय आँनलाईन आढावा

चंद्रपूर : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पूर्वतयारीचा जिल्हानिहाय आढावा केंद्रीय निवडणूक आयोगाचे उपआयुक्त हिर्देश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. यावेळीछत्रपती संभाजीनगर, नागपूर आणि अमरावती विभागातील प्रत्येक जिल्ह्याचा आढावा
घेण्यात आला.हा आढावा छत्रपती संभाजीनगर येथे बुधवारी घेण्यात आला.

निवडणूक प्रक्रिया राबविताना त्यात कोणत्याही शंकेला वाव असता कामा नये, याची खबरदारी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घ्यावी. निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे निर्देश भारत निवडणक आयोगाचे उपायक्त
हिर्देशकुमार यांनी निवडणूक यंत्रणांना दिले.

निवडणूक काळात माध्यमांमध्ये येणाऱ्या बनावट, फेक न्यूज अर्थात खोट्या माहितीचे प्रसारण तत्काळ रोखावे, खोटी माहिती असल्यास तिचे प्रसारण रोखून सत्य माहितीचे तत्काळ प्रसारण करावे. याबाबत या विभागाशी संबंधित बातम्या असतील त्यांनी तत्काळ योग्य माहिती पुरवावी व वस्तुस्थिती जनतेसमोर मांडावी, असेही बैठकीत सुचविण्यात आले.

यावेळी चंद्रपूर जिल्ह्याची संक्षिप्त माहिती, विधानसभा मतदारसंघनिहाय जिल्ह्यातील एकूण मतदारांची संख्या (स्त्री, पुरुष व इतर), मतदान केंद्रांची माहिती, मतदान केंद्रावर पुरविलेल्या किमान मूलभूत सुविधा, सहाही मतदारसंघात निवडणुकीसाठी उभे असलेले उमेदवार, जिल्ह्यात ईव्हीएम व व्हीव्हीपॅटची उपलब्धता, निवडणुकीसाठी उपलब्ध असलेले मनुष्यबळ, प्रशिक्षण, वाहतूक व्यवस्था आराखडा, वाहनांची उपलब्धता, विधानसभानिहाय करण्यात येणारे वेबकास्टींग, कायदा व सुव्यवस्था आदीबाबत माहिती देण्यात आली.

या बैठकीला राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम, अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी बी. प्रदीपकुमार यांच्यासह जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. आदी उपस्थित होते. चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयातून दूरदृष्य प्रणालीद्वारे सामान्य निरीक्षक संजयकुमार, आर. मुत्यालाराजू रेऊ, संगीता सिंग, कायदा व सुव्यवस्था निवडणूक निरीक्षक अवधेश पाठक, खर्च पथक निवडणूक निरीक्षक आदित्य बी. आणि धर्मेंद्र सिंह यांच्यासह निवडणूक निर्णय अधिकारी रवींद्र माने, संजय पवार, अजय चरडे, पर्वणी पाटील, किशोर घाडगे, दोन्तुला जेनित चंद्रा, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुभाष चौधरी उपस्थित होते.

Vidarbha Trends Team

Recent Posts

विधानसभा निवडणुकीसाठी ८५ वर्षीयपूर्ण केलेल्या, दिव्यांगत्व असलेल्या मतदारांसाठी सोय

चंद्रपूर : या जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ८५ वर्षीय पूर्ण केलेल्या, तसेच ४० टक्के व…

9 hours ago

ड्रोन कॅमेऱ्याच्या मदतीने पोलिस ठेवत आहेत नागरिकांवर लक्ष

गोंदिया : या जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. निवडणूक कालावधी पूर्ण होईपर्यंत कोणत्याही…

9 hours ago

लाच मागणाऱ्या वरिष्ठ श्रेणी लिपिकाला पोलिसांनी घेतले ताब्यात

गडचिरोली : या जिल्ह्यात सेप्टिक टाक्यांची सफाई केल्याचे बिल काढून दिल्याबद्दल पोलिस अधीक्षक कार्यालयातील वरिष्ठ…

9 hours ago

यवतमाळमध्ये सकाळी ७ वाजता पासून तीन दिवस मतदान प्रक्रिया

यवतमाळ :- यवतमाळ विधानसभा क्षेत्रामध्ये सकाळी ७ वाजता पासून १४ ते १६ नोव्हेंबर पर्यंत ८५…

13 hours ago

शिक्षकाने केला अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ

वर्धा :- शिक्षकाने आईला म्हटले तुमची मुलगी अभ्यासात कच्ची आहे मी तिला दुसऱ्या बॅचमध्ये नेऊन…

15 hours ago

हरभऱ्याच्या पिकात जंगली रानडुकरामुळे शेतात रात्रभर जागरण

अकोला:- शेतकऱ्यांनी रब्बी हंगाम लागल्यामुळे शेतात हरभरा, गहू, मका, बाजरी अशा अनेक पिकाची पेरणी केली…

16 hours ago

This website uses cookies.