अमरावती:- सायंकाळ ला ५ च्या सुमारास चाकूचा धाक दाखवून एका दुचाकीस्वाराकडून १ लाख ५२ हजाराचा मोबाईल लुटला. ही घटना अमरावती मधील तिरुमाला कॉलनी जवळ १७ नोव्हेंबरला घडली, या प्रकरणाची तक्रार दिनेश गांधी याने श्रेयस पटेल यांच्याविरुद्ध १८ नोव्हेंबर रोजी केली.
मिळालेल्या माहितीनुसार, दिनेश गांधी हा दुचाकीने ३ च्या सुमारास मंगल कार्यालयाकडे जात होता अचानक दिनेशच्या समोर त्याच्या मुलचा मित्र श्रेयस आला, व त्याने अश्लील भाषेच्या प्रयोग करून तू कृष्ण गांधी का बाप हे ना असे म्हणून शिवीगाळ केली. आणि चाकूचा धाक दाखवत मोबाईल हिसकून घेतला
मोबाईल हा १ लाख ५२ हजाराचा होता. व श्रेयस म्हणू लागला जर या प्रकरणाची तक्रार पोलिसात केली तर तुझ्या मुलाला जीवाने मारेल अशी धमकी देत तिथून पळ काढला, दिनेश गांधी याने त्वरित गाडगेनगर पोलीस स्टेशन गाठून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला, या परिसरात याआधी सोनसाखळी चोरी झाली होती व आता मोबाईल चोरी झाल्याने पोलीस आणखी सतर्क झाले, या प्रकरणाची पुढील तपास ठाणेदार गिरी करत आहेत.
चाकूचा धाक दाखवला
तिरूमला कॉलनी जवळ श्रेयस उर्फ पप्पी पटेल (२०) याने दिनेश गांधीला थांबवून ‘तू कृष्णा गांधी का बाप हे ना’ असे म्हणत चाकूचा धाक दाखवून १ लाख ५२ हजाराचा मोबाईल हीसकला, व अश्लील शिवीगाळ केली या प्रकरणी दिनेश गांधी यांनी गाडगेनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.