वाशिम:- प्रसूतीदरम्यान महिलेचे जास्त रक्तस्त्राव झाल्यामुळे महिलेचा मृत्यू झाला. ही घटना १० ऑक्टोबर रोजी धनज बु. आरोग्य केंद्रात घडली.धनज बु. या गावातील २७ वर्षीय गर्भवती वनिता चांदणे महिला ९ ऑक्टोबर रोजी हिला प्रसूतीकडा आल्या. संबंधित महिलांनी तिला धनज येथिल आरोग्य केंद्रात नेले, तेथे तपासणी केली असता माहित झाले की वनिता चांदणे हीचे हिमोग्लोबिन कमी आहे.
सोबतच्या महिलांनी डॉक्टरांना विनंती केली की अमरावतीला रेफर करा डॉक्टरांनी महिलेची प्रसूती तिथेच करण्याचा निर्णय घेतला .महिलेने एका सुंदर मुलाला जन्म दिले, पण हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असल्यामुळे प्रसूती दरम्यान जास्त रक्त गेल्याने वनिताची प्रकृती बिघडली.त्यानंतर डॉक्टरांनी अमरावतीला नेण्याचा सल्ला दिला, नेतानांच जास्त रक्तस्त्राव झाल्यामुळे महिला उपचारादरम्यान मृत्यू पावली.
कुटुंबांनी म्हंटले की डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे वनिताचा मृत्यू झाला , आम्ही जेव्हा रेफर मागत होतो तेव्हा दिले नाही. व जास्त झाल्यानंतर न्या म्हटले जेव्हा पर्यंत संबंधित डॉक्टरवर कार्यवाही कराल नाही तेव्हापर्यंत वनिता चा मृतदेह नेणार नाही.कुटुंबाचा आक्रोश बघून तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी संबंधित डॉक्टरांवर कार्यवाही करून आरोग्य केंद्रातून कार्यामुक्त केले