Send News on +91 - 92090 51524
More
    HomeGondiaडोक्यात वार करून पोटच्याच मुलाने आईलाच केले ठार

    डोक्यात वार करून पोटच्याच मुलाने आईलाच केले ठार

    Published on

    spot_img

    गोंदिया : पोटच्याच मुलाने आईलाच कुऱ्हाडीने डोक्यात वार करून आईलाच ठार केल्याची बातमी समोर आली आहे .मिळालेल्या माहितीनुसार, दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने संतप्त झालेल्या मुलाने हे कृत्य केले . मात्र, आपल्या हातून घडलेल्या या कृत्याची जाणीव झाल्यानंतर त्याने स्वतः घराजवळील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे . सुलकन फत्तेलाल बनोठे (७५) असे मृत आईचे नाव असून लेखराज फत्तेलाल बनोठे (५४) असे आरोपी व आत्महत्या करणाऱ्या मुलाचे नाव आहे. ही घटना सालेकसा तालुक्यातील कुणबीटोला-कावराबांध येथे शुक्रवारी (दि. १५) घडली.

    यात आरोपी लेखराज बनोठे हा व्यवसायाने अभियंता होता; परंतु व्यसनामुळे त्याचा संसार उद्ध्वस्त झाला होता. लेखराजच्या परिवारामध्ये त्याला चार भावंडे असून, यातील लोकेश या भावाचा आधीच मृत्यू झाला आहे. त्याच्या वडिलाचा २००७ मध्येच मृत्यू झाला होता . तर आईला मिळणाऱ्या पेन्शन व शेतीच्या उत्पन्नातून त्यांचा उदरनिर्वाह होत होता.

    सुलकनसोबत त्यांचा धाकटा मुलगा गजेंद्र (३४) आपल्या कुटुंबासह व आरोपी लेखराज राहत होता. तर लोकेशच्या मृत्यूनंतर त्यांचे कुटुंबीय व मुलगा विजय बनोठे याचे कुटुंबीय गोंदिया येथे राहतात. लेखराजच्या दारूच्या व्यसनामुळे त्याची पत्नी व मुले त्याला सोडून गेली आहेत.

    या प्रकरणात गजेंद्र बनोठे यांच्या तक्रारीवरून सालेकसा पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम १०३ (१) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास महिला पोलिस उपनिरीक्षक नागदिवे करीत आहेत.

    डोक्यात वार करणाऱ्या मुलाची पत्नी त्याला सोडून राहते :

    डोक्यात वार करून पोटच्याच मुलाने आईलाच केले  ठार

    लेखराज बनोठे याने बीई (सिव्हिल इंजिनिअर) शिक्षण पूर्ण केल्यानंतर दिल्ली, पुणे, हैदराबाद अशा अनेक ठिकाणी नोकरी केली होती . लेखराजच्या दारू पिण्याच्या सवयीमुळे त्याची पत्नी रेणुका बनोठे, मुलगा विवेक आणि मुलगी शुभांगी हे त्याला मागील २० वर्षापूर्वी सोडून गेली असून, नागपूर येथे राहतात. तेव्हापासून लेखराज आईसह राहत होता.

    Latest articles

    पोलिसांनी टाकलेल्या धाडीत जुगार खेळणाऱ्या ५ जणांना पकडले रंगेहाथ

    लाखांदूर : शेतशिवारात नहर परिसरात काही व्यक्तींनी अवैधरीत्या जुगार भरवून पैशाच्या हार-जितची बाजी लावल्याची...

    विद्यार्थ्यांना मिळणार ‘अपार कार्ड’च्या माध्यमातून नवी ओळख

    चंद्रपूर : 'वन नेशन, वन स्टुडंट आयडी' ही योजना राबविण्याचा निर्णय केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने...

    मतदान केंद्रावर मोबाईल व स्मार्ट वाॅचला बंदी असणार

    यवतमाळ:- २० नोव्हेंबरला मतदान केंद्रावर मोबाईल व स्मार्ट वॉच वापरून जाण्यास बंदी आहे, मतदान...

    बनावट शस्त्र व नकली परवाना देणाऱ्यांना अटक

    अकोला :- १५ नोव्हेंबर रोजी बनावट शस्त्र व नकली परवाना देणाऱ्यांचा पर्दाफाश करून ९...

    Read More Articles