Send News on +91 - 92090 51524
More
    HomeGondiaड्रोन कॅमेऱ्याच्या मदतीने पोलिस ठेवत आहेत नागरिकांवर लक्ष

    ड्रोन कॅमेऱ्याच्या मदतीने पोलिस ठेवत आहेत नागरिकांवर लक्ष

    Published on

    spot_img

    गोंदिया : या जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. निवडणूक कालावधी पूर्ण होईपर्यंत कोणत्याही भागात कुठेही घडणाऱ्या विविध घटना, अवैध व्यवसायासह गुप्त बाबींची माहिती काढण्याकरिता पोलिस दलाने ड्रोन कॅमेऱ्याचा वापर सुरू केला आहे. सध्या शहरी भागात आणि तालुक्याच्या ठिकाणी ड्रोन पेट्रोलिंगद्वारे सर्व बारीक हालचालींवर लक्ष ठेवल्या जात आहे. त्यामुळे दररोज कॅमेऱ्याद्वारे टिपलेल्या सर्व अवैध प्रकारांतून थेट कारवाई केली जात असल्याची माहिती समोर आली आहे . त्यामुळे अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर ड्रोनच्या कॅमेराचे माध्यमातून नजर ठेवत आहे.

    जिल्हा पोलिस अधीक्षक गोरख भामरे यांनी जिल्ह्यातील निवडणुकीच्या कालावधीत कुठल्याही प्रकारचे अवैध व्यवसाय सुरू राहू नयेत, यासाठी विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. दररोज वेगवेगळ्या भागात प्रतिबंधात्मक कारवाई, अवैध दारू विक्री, जुगार अशा प्रकरणांवर विशेष लक्ष ठेवले जात आहे.

    यासोबतच आता निवडणूक प्रक्रियेतील मतदानाचा टप्पा पूर्ण होईपर्यंत प्रत्येक भागात ड्रोन पेट्रोलिंगसुद्धा सुरू करण्यात आली आहे. शहरी भागामध्ये असो की, तालुक्याच्या ठिकाणी जर आकाशात ड्रोन कॅमेरा दिसला तर घाबरू नका. तो पोलिस यंत्रणेने अवैध व्यवसाय टिपण्यासाठी आपल्या परिसरात सोडला आहे. या माध्यमातून विविध वसाहतींत किंवा काही ठराविक भागात सुरू असलेल्या गंभीर आणि किरकोळ घटनासुद्धा समोर येणार आहेत. यामुळे कोणत्याही प्रकारे निवडणूक कालावधी असो की, त्यानंतर अवैध व्यवसाय करणाऱ्यांना लगाम बसणार आहे.

    ड्रोन कॅमेऱ्याच्या मदतीने १०९६ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई :

    ड्रोन  कॅमेऱ्याच्या मदतीने पोलिस ठेवत आहेत नागरिकांवर लक्ष

    भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, महाराष्ट्र पोलिस कायदा, शिवाय दारूबंदी आणि जुगारसोबतच विविध ठिकाणी पाहिजे असलेले गुन्हेगार, फरार आरोपी अशा सर्व जणांवर योग्य त्या प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आल्या आहेत. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सध्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत ठाणेदा- रांकडून या प्रतिबंधात्मक कारवाई सुरू आहेत. सात जणांवर एमपीडीए, ४० जणांना तडीपार, एका टोळीतील चार जणांवर ‘मकोका, ५१४ जणांजवळून अवैध दारू, २८ गुन्हे जुगाराचे, सात गुन्हे प्राणी वाहतुकीचे, चार गुन्हे अमली पदार्थाचे, तर आठ गुन्हे आर्म अॅक्टअंतर्गत दाखल करण्यात आले. आचार संहिता लागल्यापासून आजपर्यंत एकूण एक हजार ९६ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलिस दलाने दिली.

    Latest articles

    विधानसभा निवडणुकीसाठी ८५ वर्षीयपूर्ण केलेल्या, दिव्यांगत्व असलेल्या मतदारांसाठी सोय

    चंद्रपूर : या जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ८५ वर्षीय पूर्ण केलेल्या, तसेच ४० टक्के...

    लाच मागणाऱ्या वरिष्ठ श्रेणी लिपिकाला पोलिसांनी घेतले ताब्यात

    गडचिरोली : या जिल्ह्यात सेप्टिक टाक्यांची सफाई केल्याचे बिल काढून दिल्याबद्दल पोलिस अधीक्षक कार्यालयातील...

    यवतमाळमध्ये सकाळी ७ वाजता पासून तीन दिवस मतदान प्रक्रिया

    यवतमाळ :- यवतमाळ विधानसभा क्षेत्रामध्ये सकाळी ७ वाजता पासून १४ ते १६ नोव्हेंबर पर्यंत...

    शिक्षकाने केला अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ

    वर्धा :- शिक्षकाने आईला म्हटले तुमची मुलगी अभ्यासात कच्ची आहे मी तिला दुसऱ्या बॅचमध्ये...

    Read More Articles