गोंदिया : या जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. निवडणूक कालावधी पूर्ण होईपर्यंत कोणत्याही भागात कुठेही घडणाऱ्या विविध घटना, अवैध व्यवसायासह गुप्त बाबींची माहिती काढण्याकरिता पोलिस दलाने ड्रोन कॅमेऱ्याचा वापर सुरू केला आहे. सध्या शहरी भागात आणि तालुक्याच्या ठिकाणी ड्रोन पेट्रोलिंगद्वारे सर्व बारीक हालचालींवर लक्ष ठेवल्या जात आहे. त्यामुळे दररोज कॅमेऱ्याद्वारे टिपलेल्या सर्व अवैध प्रकारांतून थेट कारवाई केली जात असल्याची माहिती समोर आली आहे . त्यामुळे अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर ड्रोनच्या कॅमेराचे माध्यमातून नजर ठेवत आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षक गोरख भामरे यांनी जिल्ह्यातील निवडणुकीच्या कालावधीत कुठल्याही प्रकारचे अवैध व्यवसाय सुरू राहू नयेत, यासाठी विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. दररोज वेगवेगळ्या भागात प्रतिबंधात्मक कारवाई, अवैध दारू विक्री, जुगार अशा प्रकरणांवर विशेष लक्ष ठेवले जात आहे.
यासोबतच आता निवडणूक प्रक्रियेतील मतदानाचा टप्पा पूर्ण होईपर्यंत प्रत्येक भागात ड्रोन पेट्रोलिंगसुद्धा सुरू करण्यात आली आहे. शहरी भागामध्ये असो की, तालुक्याच्या ठिकाणी जर आकाशात ड्रोन कॅमेरा दिसला तर घाबरू नका. तो पोलिस यंत्रणेने अवैध व्यवसाय टिपण्यासाठी आपल्या परिसरात सोडला आहे. या माध्यमातून विविध वसाहतींत किंवा काही ठराविक भागात सुरू असलेल्या गंभीर आणि किरकोळ घटनासुद्धा समोर येणार आहेत. यामुळे कोणत्याही प्रकारे निवडणूक कालावधी असो की, त्यानंतर अवैध व्यवसाय करणाऱ्यांना लगाम बसणार आहे.
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, महाराष्ट्र पोलिस कायदा, शिवाय दारूबंदी आणि जुगारसोबतच विविध ठिकाणी पाहिजे असलेले गुन्हेगार, फरार आरोपी अशा सर्व जणांवर योग्य त्या प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आल्या आहेत. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सध्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत ठाणेदा- रांकडून या प्रतिबंधात्मक कारवाई सुरू आहेत. सात जणांवर एमपीडीए, ४० जणांना तडीपार, एका टोळीतील चार जणांवर ‘मकोका, ५१४ जणांजवळून अवैध दारू, २८ गुन्हे जुगाराचे, सात गुन्हे प्राणी वाहतुकीचे, चार गुन्हे अमली पदार्थाचे, तर आठ गुन्हे आर्म अॅक्टअंतर्गत दाखल करण्यात आले. आचार संहिता लागल्यापासून आजपर्यंत एकूण एक हजार ९६ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलिस दलाने दिली.
चंद्रपूर : या जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ८५ वर्षीय पूर्ण केलेल्या, तसेच ४० टक्के व…
गडचिरोली : या जिल्ह्यात सेप्टिक टाक्यांची सफाई केल्याचे बिल काढून दिल्याबद्दल पोलिस अधीक्षक कार्यालयातील वरिष्ठ…
यवतमाळ :- यवतमाळ विधानसभा क्षेत्रामध्ये सकाळी ७ वाजता पासून १४ ते १६ नोव्हेंबर पर्यंत ८५…
वर्धा :- शिक्षकाने आईला म्हटले तुमची मुलगी अभ्यासात कच्ची आहे मी तिला दुसऱ्या बॅचमध्ये नेऊन…
अकोला:- शेतकऱ्यांनी रब्बी हंगाम लागल्यामुळे शेतात हरभरा, गहू, मका, बाजरी अशा अनेक पिकाची पेरणी केली…
भंडारा : या जिल्ह्यातील धुसाळा (कांद्री) येथे मागील काही दिवसांपासून धान पिकासाठी वातावरण अनुकूल नसल्याने…
This website uses cookies.