यवतमाळ: तरुणांना आपण किती दबंग आहो, हे दुसऱ्यांना दाखविण्याच्या नादामुळे कित्येकांना आपला वाढदिवस पोलिसांच्या कोठडीमध्ये साजरा करावा लागतो. वाढदिवसाचा केक कापण्यासाठी मोठ मोठ्या तलवारीचा प्रयोग करणे तसेच देशी कट्टा किंवा पिस्तूल मधून हवेत गोळ्या बार करणे, अशा प्रकारचे स्टंट करणाऱ्यावर पोलीस नेहमी लक्षात ठेवत असतात. आणि यातील काही तरुण अशा प्रकारचे कारनामे करून त्यांचे फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतात.
अशा लोकांवर भारतीय हत्या प्रतिबंधक कायद्यानुसार कार्यवाही केली जात असते. अशी कार्यवाही मागील आठ महिन्यांमध्ये ११० जणांवर झाली. वेगवेगळ्या प्रकारचे स्टंट तरुण वाढदिवसाच्या दिवशी करत असतात, समाजाच्या उपयोगाचे काम सोडून हुल्लडबाजी वर जास्त भर देत असतात. वाढदिवसाच्या केक कापण्यासाठी तलवार किंवा धारदार शस्त्र वापरत असतात. अशा कार्यक्रमात मित्रमंडळीही असते. पण पोलिसांना सापडल्यानंतर कोणी सोबत राहत नाही. अशामुळे तरुणांचा वाढदिवस हा पोलीस कोठडीतच होतो.