अमरावती:- तरुणाने मुलीशी लग्न जोडुन कुटुंबियांना सांगितले की मला मुलीशी एकट्यात बोलायचे आहे, व तो विवाह जुळलेल्या तरुणीला घेऊन एका हॉटेलमध्ये तिच्यासोबत बळजबरीने शरीरसंबंध बनवले ही घटना ६ ऑक्टोबरला दुपारला १२ च्या सुमारास धामणगाव गावामध्ये घडली, या प्रकरणाची तक्रार फिर्यादी तरुणीने दत्तापूर पोलीस ठाण्यात केली.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीचे नाव समरजीत सिंग (३५) याने व तरुणीच्या कुटुंबीयांने एकमेकांना बायोडाटा व्हाट्सअपवर पाठवला, दोघांच्या ही कुटुंबीयांना बायोडाटा पटल्यानंतर दोन्ही कुटुंबीयांचे फोनवर बोलणे झाले, पाहणी झाल्यानंतर तरुणांनी एकट्यात बोलायचे आहे म्हणून दत्तापूरच्या हॉटेलमध्ये मुलीला घेऊन गेला,
रूममध्ये नेऊन जवळीक साधण्याचा प्रयत्न केला मुलीने नकार दिल्यावर बळजबरीने तिच्याशी शरीरसंबंध स्थापित केले. लग्न होणारच आहे काही नाही होणार असे समजावले त्यानंतर मुलीच्या काकानी लग्नाची तारीख काढण्यासाठी कॉल केल्यानंतर लग्न करण्यास नकार दिले.

तरुणाने कुठे केले संबंध प्रस्थापित
तरुणाने दत्तापूर येथील हॉटेलमध्ये तरुणीला नेऊन आपले लग्नच होणार आहे असे सांगून शरीरसंबंध प्रस्थापित केले, मुलीच्या काकांनी लग्नाची तारीख काढण्यासाठी कॉल केल्यानंतर लग्नास नकार दिला या प्रकरणी तरुणीने दत्तापूर पोलीस ठाण्यात भारतीय न्यायीक संहितेच्या कलम ६९ नुसार फसवणूक करून लैंगिक संबंध ठेवण्याबाबत गुन्हा दाखल केला.