गडचिरोली :या जिल्ह्यातील तांत्रिक शिक्षणाचे धडे घेणार्या कॉलेजमधील विद्यार्थ्यांच्या वसतीगृहात, भातामध्ये अळ्या निघत असल्याची बातमी समीर आली आहे .
खर तर एकीकडे शासन शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर व पोषणावर बराच पैसा खर्च करते, त्यासोबतच विविध योजनांमधून कुपोषण मुक्तीसाठी प्रभावी प्रयत्न गडचिरोलीत केले जात आहे. तर दुसरीकडे तांत्रिक शिक्षणाचे धडे देणाऱ्या कॉलेजमधील विद्यार्थ्यांना , वसतिगृहात चांगले भोजन मिळत नसल्याने त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
शहराबाहेर तांत्रिक शिक्षणाची सुविधा असून तिथे वसतीगृह बांधण्यात आले आहे .या वस्तीगृहात बाहेरगावचे रहिवासी असलेल्या व तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना निवासी सुविधा आहे .
यासाठी वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना वार्षिक एक हजार रुपये शुल्क अदा करावे लागते.तर भोजनाचे जवळपास दीड हजार रुपये खर्च अदा करावा लागतो .एवढ्या पैशांत मुलांना दोन वेळचे भोजन उपलब्ध करून दिले जाते.परंतु या वास्तेगृहातील भोजनाचा दर्जा खालावलेला असतो .त्यामुळे विद्यार्थ्यांना याचा त्रास होतो आहे.