Bhandara

तुमसर मध्ये सेवानिवृत्त तहसीलदार यांच्या घरी 1 लाख 95 हजारांची चोरी ,शेजारीच राहणारी तरुणी चोर असल्याचे आढळले.

भंडारा येथील तुमसर मध्ये सेवानिवृत्त तहसीलदार यांच्या घरी एक लाख 95 हजारांची रोख चोरी झाली. शेजारीच राहणाऱ्या तरुणीने चोरी केल्याचे समोर आले आहे .

सेवानिवृत्त तहसीलदार संजय यादवराव रामटेके यांनी घराला कुलूप लावून किल्ली घराच्या पोर्चमध्ये ठेवलेल्या दुचाकीच्या टपमध्ये ठेवली होती. यातच चोरट्यांनी डाव साधत घरात शिरून १ लाख ९५ हजारांची रोकड़ लंपास केली.

रामटेके हे विनोबा नगरातील सुनील वंजारी येथे भाड्याने राहतात. शनिवारी सकाळी ५.५० ते ७:१५ वाजताच्या सुमारास फिरायला गेले होते.
त्यांनी घराला कुलूप लावून किल्ली दुचाकी वाहनाच्या टपमध्ये ठेवली होती. पाळत ठेवलेल्या चोराने, रामटेके हे बाहेर जाताच दुचाकीच्या टपमधून किल्ली काढली व आत प्रवेश केला. तसेच लॉकरमधील १ लाख ९५ हजार रोख लंपास केले. फिरुन आल्यानंतर रामटेके यांना लॉकरमधील रोख लंपास झाल्याचे आढळले.

याबद्दल तुमसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असता पोलिसांनी अवघ्या दोन तासांत आरोपीचा शोध लावला. यात चोरीचा शोध लावण्याकरिता श्वान पथकाची मदत घेण्यात आली .रामटेके यांच्या घराजवळील बाजूला असलेल्या सीसीटीव्हीची तपासणी करण्यात आली.
तरुणी नेमक्या त्याच वेळी आढळून आली. सेवानिवृत तहसीलदार रामटेके यांच्या घराजवळ ती तरुणी राहते, हे तपासात दिसुन झाले. तपासानंतर संबंधित तरुणीने रोख रक्कम लंपास केले. तरुणी जवळून १ लाख २५ हजार रोख हस्तगत करण्यात आली. तपास पोलिस उपनिरीक्षक धर्मेंद्र बोरकर करीत आहेत.रामटेके यांना लॉकरमधील रोख लंपास झाल्याचे आढळले. तुमसर पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध कलम ३१३(३), ३०५ (अ) भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Vidarbha Trends Team

Recent Posts

शेजारील व्यक्तीने आई व मुलाच्या अंगावर ज्वलनशील केमिकल टाकले

अमरावती:- पिंपळखुटा येथे बुधवार ला १२ वाजताच्या दरम्यान शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने झोपेत असलेल्या महिला व…

25 minutes ago

विधानसभा निवडणुकीसाठी ८५ वर्षीयपूर्ण केलेल्या, दिव्यांगत्व असलेल्या मतदारांसाठी सोय

चंद्रपूर : या जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ८५ वर्षीय पूर्ण केलेल्या, तसेच ४० टक्के व…

15 hours ago

ड्रोन कॅमेऱ्याच्या मदतीने पोलिस ठेवत आहेत नागरिकांवर लक्ष

गोंदिया : या जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. निवडणूक कालावधी पूर्ण होईपर्यंत कोणत्याही…

15 hours ago

लाच मागणाऱ्या वरिष्ठ श्रेणी लिपिकाला पोलिसांनी घेतले ताब्यात

गडचिरोली : या जिल्ह्यात सेप्टिक टाक्यांची सफाई केल्याचे बिल काढून दिल्याबद्दल पोलिस अधीक्षक कार्यालयातील वरिष्ठ…

15 hours ago

यवतमाळमध्ये सकाळी ७ वाजता पासून तीन दिवस मतदान प्रक्रिया

यवतमाळ :- यवतमाळ विधानसभा क्षेत्रामध्ये सकाळी ७ वाजता पासून १४ ते १६ नोव्हेंबर पर्यंत ८५…

19 hours ago

शिक्षकाने केला अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ

वर्धा :- शिक्षकाने आईला म्हटले तुमची मुलगी अभ्यासात कच्ची आहे मी तिला दुसऱ्या बॅचमध्ये नेऊन…

20 hours ago

This website uses cookies.