चुल्हाड (भंडारा) :भंडारा येथील तुमसर तालुक्यातील चुल्हाड या गावात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर तीन युवकांनी अत्याचार केला. ही अल्पवयीन मुलगी तिच्या मामाच्या घरी जात होती .तेव्हा वाटतच तीन युवकांनी तिच्यावर अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे .ही अल्पवयीन मुलगी पंधरा वर्षाची होती ,ती मामाच्या घरी जाण्यासाठी निघाली होती. आणि काही वेळानंतर ती मामाच्या घरी पोहोचली का, अशी विचारणा करण्यासाठी तिच्या घरच्यांनी तिच्या मामाला फोन लावला, परंतु ती मामाकडे पोहोचलीच नाही असे आढळले .
त्यामुळे तिच्या घरच्यांनी मामाचे घर गाठले .आणि पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर तीन युवकांनी तिच्यावर अत्याचार केल्याचे तिने सांगितले .याची माहिती पोलिसांनी काढली असता चैतराम मूलचंद वानखेडे(२९, सुकडी ,तालुका मोहाडी) ,अविनाश पटवारी राऊत (२३,बोरी रोड ,शहर वार्ड तुमसर )आणि अविनाश उर्फ सागर युवराज खुडसाम(२३, रनेरा) असे या तीन नराधमांची नावे आहेत.
या तिघांवरही भारतीय न्याय संहितेचे कलम १३७(२),६५,३५१(२), सहकलम ४,६,बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.