तुमसर : रामटेक गोंदिया राष्ट्रीय महामार्गावर दोन ट्रक थांबले होते. थांबलेल्या ट्रकजवळ एका चारचाकी वाहन तिथे आले. त्या वाहनामध्ये चार ते पाच तरुण होते. त्यांनी दोन वाहनचालकांना व क्क्लिनरला तलवारीचा धाक दाखवीला.आणि डिझेल टँकमधून डिझेल काढले. त्यात कोळसा घेऊन जाणारा ट्रक, तर दुसरा गॅस सिलिंडर वाहतूक करणाऱ्या ट्रकचा समावेश आहे.
काही नागरिक शनिवारी पहाटे मॉर्निंग वाकला जात होते. दोन्ही ट्रकचालकांनी तुमसर पोलिस स्टेशनची माहिती विचारली. पोलिस ठाण्याचे अंतर किती आहे, हे त्यांनी विचारले. याबाबत या नागरिकांनी ट्रकचालकांना काय घडले, असे विचारले. तेव्हा ट्रकचालकांनी त्यांच्यासोबत घडलेल्या घटनेची माहिती सांगितली.
परंतु दोन्ही ट्रक चालकांनी त्यांच्या मालकाला फोन करून या घटनेबद्दल माहिती दिली असता त्यांच्या मालकांनी या घटनेबद्दल पोलिसात तक्रार देऊ नका असे त्यांना सांगितले.त्यामुळे त्यांनी पोलिसांत तक्रार नोंदवली नाही.व तिथुन दोन्ही ट्रकचालक निघुन गेले.
रामटेक तुमसर-गोंदिया या राष्ट्रीय महामार्गावर २४ तास वाहने चालत असतात. रामटेक- गोंदिया मार्गावर नेहमीच ये-जा असल्याने धोका न पत्करण्याच्या निर्णय त्या मालकांनी घेतला. घडलेल्या घटनेमुळे मात्र महामार्गावरील ट्रकचालकही घाबरले होते.
काही महिन्यांपासून डिझेल चोरी करणारी टोळी सक्रिय आहे. असे तेथील नागरीकांच्या चर्चा सुरू आहे. परंतु शस्त्र घेऊन ही टोळी आता ट्रकचालकांना लुटत असल्याचे समोर आले आहे. महामार्गावरील फिरत्या पोलिस पथकाने या टोळीचा पर्दाफाश करावा मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
चंद्रपूर : या जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ८५ वर्षीय पूर्ण केलेल्या, तसेच ४० टक्के व…
गोंदिया : या जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. निवडणूक कालावधी पूर्ण होईपर्यंत कोणत्याही…
गडचिरोली : या जिल्ह्यात सेप्टिक टाक्यांची सफाई केल्याचे बिल काढून दिल्याबद्दल पोलिस अधीक्षक कार्यालयातील वरिष्ठ…
यवतमाळ :- यवतमाळ विधानसभा क्षेत्रामध्ये सकाळी ७ वाजता पासून १४ ते १६ नोव्हेंबर पर्यंत ८५…
वर्धा :- शिक्षकाने आईला म्हटले तुमची मुलगी अभ्यासात कच्ची आहे मी तिला दुसऱ्या बॅचमध्ये नेऊन…
अकोला:- शेतकऱ्यांनी रब्बी हंगाम लागल्यामुळे शेतात हरभरा, गहू, मका, बाजरी अशा अनेक पिकाची पेरणी केली…
This website uses cookies.