अमरावती:- दारूच्या बंदोबस्त लावण्याकरिता अमरावती पोलिसांनी रविवारला संपूर्ण जिल्ह्यात सर्व प्रमुख मार्गावर नाकेबंदी केली, ही कारवाई २० नोव्हेंबरला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी केली यात अवैध चालणाऱ्या कामावर मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू झाली. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी देशी बनावटीच्या आणि ब्रांडेड दारूचा अवैध व्यापाऱ करणाऱ्यांना लक्ष केले.
यात एकूण ७.१४ लाख रुपयांचा अवैध मुद्देमाल जप्त झाला, ज्यामध्ये १६६० लिटर देशी दारू व ६९९५ लिटर महुआ वापरण्यात आला. इतर साहित्य हे १.३० लाख किमतीचे जप्त करण्यात आले.अमरावती पोलिसांना या मोहिमेमध्ये बरेच यश प्राप्त झाले संपूर्ण कारवाई मध्ये पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान रस्त्यावर चालणाऱ्या गाड्यांची तपासणी केली, गुन्हेगारांची तपासणी केली यात एसडीपीओ सह ५०० कर्मचारी व इतर १०० अधिकाऱ्यांनी या मोहिमेत यश प्राप्त केले.
दारूचा बंदोबस्त लावण्यात यश
अमरावती पोलिसांनी व अधिकाऱ्यांनी बेकायदेशीर देशी दारू विकणाऱ्यांचे ४३ प्रकरणे व ब्रँडेड दारू विकणाऱ्यांची १८ गुन्हे नोंदविले, यात पोलिसांना ५९,६३५ रुपयांच्या दारूसह त्यांनी इतर मौल्यवान वस्तू जप्त केल्या, या नाकेबंदी मोहिमेमध्ये दारूच्या बंदोबस्त लावण्यात पोलीस प्रशासनाला बरेच यश प्राप्त झाले.