अमरावती :- दारू पिऊन गाडी चालविणाऱ्यावर परिवहन मंत्रालयाने १० हजार रुपये दंड व सहा महिने कारावासाची शिक्षा सुनावली आहे, व एक वर्षासाठी त्यांचे वाहन सुद्धा जप्त केल्या जाईल.गेलेल्या नऊ महिन्यांमध्ये ट्रॅफिक पोलिसांनी ५१ जनाविरुद्ध कार्यवाही केली आहे आतापर्यंत दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यावर सहा महिन्याचा कारावास व २ हजार रुपये दंड होता.
नवीन नियमानुसार त्यामध्ये बदल करून दहा हजार रुपये दंड व दोन पटीने कारावासाची शिक्षा देण्यात येईल असा नियम लागू करण्यात आला आहे. तरीही दारू पिऊन आढळल्यास त्यांचे लायसन्स रद्द केले जाईल,
गेल्या वर्षी अशा १४ व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला. यावर्षीपासून या शिक्षेत पाच पटीने वाढ झाली आहे म्हणून दारू पिऊन वाहन चालविणे टाळावे असे परिवहन विभाग सांगतात.