अमरावती :- दिवाळीत दुपारचे ४ च्या दरम्यान चांदूर बाजार तालुक्यातील पिंपरी पूर्णा नदीपात्रात अंघोळीसाठी गेलेल्या दिवाळीत मामाच्या गावी आतेभाऊ व मामेभावाचा मृत्यू झाला.मिळालेल्या माहितीनुसार सम्यक इंगळे (१६) व प्रणव मनोहर (२१)अशी मृत युवकांची नावे आहेत.
सम्यक इंगळे हा गावाजवळच्या शाळेत ९ व्या वर्गात शिकत होता तर प्रणव महाविद्यालय शिक्षण घेत होता, दिवाळीच्या सुट्ट्या लागल्यामुळे प्रणव हा मामाच्या गावी गेला काही दिवस राहिल्यानंतर आतेभाऊ व मामेभावाने पूर्णा नदीपात्रात आंघोळ करायला जायचे म्हणून युक्ती योजली,
त्यांनी कुटुंबीयांना आंघोळीसाठी जातो म्हणून माहिती दिली. आणि १०:३० च्या सुमारास घरून निघाले ३ वाजले तरी दोघे भाऊ घरी परतले नाही म्हणून कुटुंबीयांनी दोघांचा शोध घेतला. नदीपात्रावर शोध घेण्यासाठी गेले असताना नदीच्या काठावर त्यांना दोघांची कपडे आढळून आले पण ते दोघे दिसले नाही,
नंतर काही वेळाने नदीपात्रात दोघांचे मृतदेह आढळले. गावकऱ्यांची तिथे गर्दी जमली गावकऱ्यांच्या मदतीने कुटुंबीयांनी दोन्ही मृतदेह बाहेर काढले, या घटनेची माहिती पोलीस पथकांना मिळतात त्यांनी नदीपात्र गाठले व मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले व शवविच्छेदनानंतर कुटुंबियांना मृतदेह सोपवून आकस्मिक मृत्यूची नोंद केली.
चंद्रपूर (सास्ती) : राजुरा तालुका पांढऱ्या सोन्यासाठी प्रसिद्ध आहे.गेल्या काही आठवड्यांपासून जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये मजूर…
अमरावती :- २० नोव्हेंबरला दोनच्या सुमारास ७५ वर्षीय वृद्धाचा मतदान करून घरी परतताना अपघातात मृत्यू…
गोंदिया (अर्जुनी मोरगाव) : घरात पतीचा मृतदेह असतांना, कुटुंबात दुःखाचे सावट सर्वत्र पसरलेले असतांना, जन्मदात्याचे…
वाशिम :- खाजगी बाजारामध्ये पांढरा सोन्याची आवक वाढल्याचे दिसून येत आहे यावर्षी पाऊस चांगल्या प्रमाणात…
गडचिरोली : निवडणूक कर्तव्यावर असलेले पोलिस पथक, निवडणूक कर्मचारी, अधिकारी हे रांगेत उभे असोत, किंवा…
बुलढाणा:- २० नोव्हेंबरला निवडणुकीचे कामानिमित्त २६८ बसेस राखीव ठेवण्यात आल्या होत्या , त्यामुळे दोन दिवस…
This website uses cookies.