गडचिरोली :या जिल्ह्यातील अहेरी या गावात दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाल्याने ग्रामसेवक जागीच ठार झाला. ही घटना रात्री आलापल्ली वळणावर घडली. रघुनाथ तुळे मुळमा (३८, रा. कुकामेटा ता. भामरागड) असे मयत ग्रामसेवकाचे नाव आहे.
ते एटापल्ली तालुक्यातील घोटसूर ग्रामपंचायतमध्ये कार्यरत होते. ते १५ रोजी सायंकाळी ६ वाजता दुचाकीवरुन भामरागडकडे जात होते. आलापल्ली वळणावर समोरुन येणाऱ्या दुचाकीने त्यांना जोराची धडक दिली, यात त्यांच्या डोक्याला व छातीला जबर दुखापत झाली.
त्यांनतर त्यांना उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करुन चंद्रपूरला पाठविले. यादरम्यान वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी अहेरी पोलिस ठाण्यात धडक देणाऱ्या दुचाकीस्वारावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या मार्गावर गेल्या काही दिवसांत अपघात वाढले असल्याचे चित्र आहे.