Bhandara

धानाचा हंगाम आटोपल्याने रब्बी हंगामाची वाढली लगबग

भंडारा : सध्या ट्रॅक्टरद्वारे नांगरणी करून फेकीव पद्धतीने पेरणी केली जात आहे. कारण धानाचा हंगाम आटोपल्याने रब्बी हंगामाची लगबग वाढलेली आहे. परंतु, अनेकांनी अतिओलाव्यात ट्रॅक्टरद्वारे नांगरणी शक्य नसल्याने ओलावा आटण्याच्या शक्यतेने बैलजोडीने पेरणी सुरू केली आहे . ट्रॅक्टरमुळे अतिखोलवर गेलेले बियाणे उगवत नाहीत. तर, बैलजोडीच्या पेरणीत उगवण क्षमता अधिक राहत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

भंडारा जिल्ह्यात खरीपात सर्वाधिक धानाची शेती केली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांचा कल कडधान्य पेरणीकडे दिसून येत आहे. धान पट्टयात खरिपाच्या धानाची कापणी झाली की, काही शेतकरी रब्बीच्या पिकासाठी ट्रॅक्टर नांगरणीचा एक तास देऊन जमिनीत बियाणे टाकून पुन्हा नांगरणी करीत असतात.

अशावेळी बरेच बियाणे जमिनीच्या आतमध्ये जातात. आतमध्ये गेलेले बियाणे उगवत नाहीत. बैलजोडीच्या हलक्या पावलाने उगवण क्षमतेवर परिणाम होत नाही. यावर्षी चांगला पाऊस झाला. त्यामुळे शेतजमीन रब्बी पिकांसाठी अनुकूल आहे असा अंदाज वर्तवला जात आहे . यंदाच्या रब्बी हंगामात हरभरा, गहू, उडीद, मूग, मसूर, वाटाणा आदी पिकांची लागवड केली जात आहे. परंतु, हंगामात नांगरणीसाठी जमिनीत ओलावा नसेल, तर ट्रॅक्टरची नांगरणी योग्य राहते.

धानाचा हंगाम आटोपल्यानंतर याची पेरणी करावी :

सध्या तेलवर्गीय पिकांना चांगली मागणी आहे. शिवाय ही पीके नगदी पिके आहेत. त्याची पेरणी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी करावी, त्यासाठी निरोगी बियाण्यांची लागवड करावी, असे आवाहन कृषी कार्यालयाच्या वतीने करण्यात येत आहे . यासोबतच यावर्षी तलाव, बोड्यांसह नदी, नाल्यात जलसाठा पर्याप्त आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी हरभरा, गव्हासह ज्वारी, बाजरी, मका, तृणधान्य पिके, सूर्यफूल, करडई, जवस, मोहरी या तेलवर्गीय पिकांचे उत्पादन घ्यावे.

Vidarbha Trends Team

Recent Posts

तरुणाने लग्नापूर्वी ठेवले शरीरसंबंध

अमरावती:- तरुणाने मुलीशी लग्न जोडुन कुटुंबियांना सांगितले की मला मुलीशी एकट्यात बोलायचे आहे, व तो…

4 months ago

तरुणीवर दोघांनी केला अत्याचार

अमरावती :- २५ वर्षीय तरुणीवर वारंवार दोन व्यक्तींनी अत्याचार केला, आक्षेपार्ह फोटो व्हिडिओ व्हायरल करण्याची…

4 months ago

मारहाण करून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

बुलढाणा:- मारहाण करून अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस ४ वर्षाचा कारावास व ११ हजार रुपये…

4 months ago

घराघरांवर क्युआर कोड लावले

अकोला:- कचरा व्यवस्थापनासाठी घराघरांवर शहरात क्युआर कोड लावले या कोडचा वापर शहरातील घरामधील कचरा नियमित…

4 months ago

रेशनच्या ई – केवायसीसाठी ३१ डिसेंबर पर्यंत मुदतवाढ

अमरावती:- रेशनच्या ई - केवायसीसाठी ३१ डिसेंबर पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे, सार्वजनिक प्रणाली अंतर्गत रेशनकार्ड…

4 months ago

विकलांग बालकावर अत्याचार करणाऱ्यांना पाच वर्षाची शिक्षा

यवतमाळ :- मानसिक विकलांग बालकावर अत्याचार करणाऱ्या आरोपींना ५ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे,…

4 months ago

This website uses cookies.