वैरागड : धान पीक आता शेवटच्या टप्प्यात असून, कापणीची वेळ असताना हत्तीकडून धान पिकाची नासाडी होत असल्याने शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे.
मागील महिनाभरात हत्तींचा उपद्रव नसल्याने शेतकऱ्यांनी व वनाधिकारी कर्मचाऱ्यांनी सुटकेचा निःश्वास टाकला होता. पण चंद्रपूर जिल्ह्यातील मूल, सावली या जंगलातून हत्तीने आपला मोर्चा पुन्हा गडचिरोली जिल्ह्यात वळवला आहे .धान पीक आता शेवटच्या टप्प्यात असून, कापणीची वेळ असताना हत्तीकडून धान पिकाची नासाडी होत असल्याने शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे.
तर पोर्ला जंगलातून आता रानटी हत्तीचा कळप गुरुवारच्या रात्री कोजबी शिवारात दाखल झाला. या कळपाने कोजबी शेतशिवारातील धान पिकाची मोठ्या प्रमाणात नासाडी केली आहे.सध्या त्यांचा वावर पोर्ला वनपरिक्षेत्रात असून, आता हा कळप कोजबी शिवारात दाखल झाला आहे.
पोर्ला वनपरिक्षेत्रात हत्तीचा प्रवेश केल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून वनविभागाचे अधिकारी आणि हुल्ला टीम हत्तीच्या मागावर आहे. तरी जंगलात लगत असलेल्या कोजबी येथील वासुदेव दुमाने यांच्या शेतातील
उभ्या धान पिकाची व सूरज दुमाने यांच्या धनाच्या गंजीची हत्तीने नुकसान केली आहे. हत्तींचा कळप आणखी किती दिवस या भागातील पिकांची नासधूस करणार, असा सवाल शेतकऱ्यांचा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
कापणीला आलेल्या धानाची नासधूस सध्या मध्यम व अधिक मुदतीचे धानपीक कापणीला आलेले आहे. पंधरवड्यात कापणीचा हंगाम पूर्ण होईल, अशातच रानटी हत्तींचा कळप पिकावर ताव मारून नासधूस करीत असल्याने शेतकरी त्रस्त आहेत. वनविभागाने उपाययोजना कराव्यात.
रानटी हत्ती सध्या शिर्सी वनक्षेत्रात असून रानटी हत्तींना वढवण्यासाठी हुल्ला टीम आणि वनविभागाचे अधिकारी कर्मचारी रात्रंदिवस पहारा देत आहेत. ज्या शेतकऱ्यांची हत्तीकडून पिकाची नासाडी झाली असेल लवकर पंचनामे नुकसानभरपाई देण्यात येईल.असे मत सिर्सी येथील क्षेत्र सहायक, एम. एन. बोगा यांनी व्यक्त केले आहे.