Gadchiroli

धान विक्री करण्यासाठी एका महिन्याची वाढवली मुदत

गडचिरोली : आधारभूत धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करण्यासाठी मुदत आता एक महिन्याने वाढवण्यात आली आहे. यासाठी ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे. १५ नोव्हेंबरपर्यंतच ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी
मुदत होती. परंतु आता शेतकऱ्यांना १५ डिसेंबरपर्यंत नोंदणी करता येणार आहे.

राज्य शासनाने धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपयांचा बोनस जाहीर केला आहे. विशेष म्हणजे त्यासाठी आधारभूत खरेदी केंद्रावर धानाची विक्री करण्याची अट नसणार आहे .ही नोंदणी केल्यानंतर हेक्टरी २५ हजार रुपये मिळणार आहेत. मागील वर्षी बहुतांश शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला होता. त्यामुळे यावर्षीही नोंदणीसाठी शेतकरी गर्दी करीत आहेत . काही अपवाद वगळता सर्वच शेतकरी आता नोंदणी करणार आहेत. फेडरेशनमार्फत खरेदी करण्यात येत असलेल्या अॅपमध्ये शेतकऱ्याची बरीच माहिती भरायची आहे. त्यामुळे नोंदणीला बराच वेळ लागत आहे.

एका शेतकऱ्याची माहिती भरण्यासाठी जवळपास २० मिनिटांचा कालावधी लागत आहे. त्यामुळे दिवसभरात जेमतेम ३० शेतकऱ्यांची नोंदणी होत आहे. तसेच अॅपही व्यवस्थित काम करीत नाही. त्यामुळे नोंदणी करण्यास बराच उशीर होत आहे. दिवाळी संपल्यानंतर नोंदणीला सुरुवात झाली. जिल्हाभरातील जेमतेम पाच हजार शेतकऱ्यांची नोंदणी झाली असेल असा अंदाज आहे . त्यामुळे १५ डिसेंबरनंतरही मुदतवाढ द्यावी लागणार आहे.

अनेक शेतकरी धान कापणी व बांधणीच्या कामात व्यस्त असल्याने १५ नोव्हेंबरपर्यंत नोंदणी करू शकले नाहीत. आता १५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे .

धान विक्री करण्यासाठी नोंदणी केंद्राची संख्या कमी :

जिल्हाभरात धान पिकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. त्यामुळे प्रत्येक शेतकरी यासाठी नोंदणी करणार आहे. त्यामानाने शेतकऱ्यांच्या संख्येच्या तुलनेत नोंदणी केंद्रांची संख्या कमी आहे. त्यामुळे नोंदणीला बराच उशीर होत आहे. गडचिरोली तालुक्यात फेडरेशनसाठी केवळ गडचिरोली व बोदली येथेच नोंदणीची सोय आहे. त्यामुळे प्रत्येक दिवशी शेतकऱ्यांची गर्दी उसळूनही नोंदणी होत नसल्याचे दिसून येत आहे. महिनाभराची मुदतवाढ दिली असली तरी हा कालावधी पुरेसा नाही. पुन्हा मुदतवाढ द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे .

Vidarbha Trends Team

Recent Posts

पोलिसांनी टाकलेल्या धाडीत जुगार खेळणाऱ्या ५ जणांना पकडले रंगेहाथ

लाखांदूर : शेतशिवारात नहर परिसरात काही व्यक्तींनी अवैधरीत्या जुगार भरवून पैशाच्या हार-जितची बाजी लावल्याची बातमी…

5 hours ago

डोक्यात वार करून पोटच्याच मुलाने आईलाच केले ठार

गोंदिया : पोटच्याच मुलाने आईलाच कुऱ्हाडीने डोक्यात वार करून आईलाच ठार केल्याची बातमी समोर आली…

6 hours ago

विद्यार्थ्यांना मिळणार ‘अपार कार्ड’च्या माध्यमातून नवी ओळख

चंद्रपूर : 'वन नेशन, वन स्टुडंट आयडी' ही योजना राबविण्याचा निर्णय केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने राष्ट्रीय…

8 hours ago

मतदान केंद्रावर मोबाईल व स्मार्ट वाॅचला बंदी असणार

यवतमाळ:- २० नोव्हेंबरला मतदान केंद्रावर मोबाईल व स्मार्ट वॉच वापरून जाण्यास बंदी आहे, मतदान करताना…

9 hours ago

बनावट शस्त्र व नकली परवाना देणाऱ्यांना अटक

अकोला :- १५ नोव्हेंबर रोजी बनावट शस्त्र व नकली परवाना देणाऱ्यांचा पर्दाफाश करून ९ जणांना…

10 hours ago

रानटी हत्तीच्या कळपाने प्रवेश केला चुरचुरा परिसरात

गडचिरोली : या जिल्ह्यात हत्तींचा कळप पाल नदी ओलांडून देलोडाच्या जंगलात दाखल झाला आहे.देलोडा व…

1 day ago

This website uses cookies.