अमरावती :- निवडणुकीच्या काळात पोलीस पथक अत्यंत सक्रिय झाले आहेत १३ नोव्हेंबरला दुपारच्या वेळेस पोलीस पथक गस्त घालत असतांना त्यांनी श्याम व मानवीय चौकामध्ये दोन वाहनांची तपासणी केली असता, ६२ लाख १२ हजार १४४ रुपये मिळाले त्यांनी ही रक्कम जमा करून आरोपीविरुद्ध कारवाई केली.
मिळालेल्या माहितीनुसार, दुपारच्या वेळेस पोलीस पथक गस्त घालत असताना त्यांना एक व्यक्ती चार चाकी मधून रक्कम मोजताना दिसला, त्यामुळे गुन्हे शाखा पोलिसांनी तिथे जाऊन चौकशी केल्यावर त्यांनी म्हटले आम्ही रेडिएंट कॅश मॅनेजमेंट कंपनीचे कर्मचारी आहोत ही रक्कम व्यापाऱ्याकडून बँकेत जमा करण्यासाठी १४ लाख नेत आहे.
पोलिसांनी रक्कम तपासल्यानंतर त्यांना १४ लाखाऐवजी ३६ लाख ४० हजार ५१९ रुपये रक्कम आढळली.पोलीस पथक आरोपी व रकमेसह पोलिस ठाण्यात जाण्यास निघाले, तेव्हा आणखी एक संशयास्पद कार दिसली. त्यांना गुन्हे शाखा पोलिसांनी अडवून विचारले त्यांनी सुद्धा म्हटले की आम्ही रेडियंट कॅश मॅनेजमेंट बँक कर्मचारी असून ही रक्कम दोन कोटी १५ लाख बँकेत जमा करण्यासाठी नेत आहोत.
त्यानंतर हे मिळालेली रक्कम पोलिसांनी तपासल्यानंतर ती दोन कोटी १५ लाख ऐवजी दोन कोटी २५ लाख ७१ हजार ६२५ रुपये रोख रक्कम आढळली, त्यानुसार पोलिसांनी दोन्ही चारचाकी वाहने व आरोपींना ताब्यात घेऊन कोतवाली पोलीस ठाण्यात नेले व आरोपीविरुद्ध कायद्यान्वये गुन्हा दाखल केला.