अकोला :- शनिवारला मुख्य निवडणुकीत कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार विधानसभा निवडणूक २० नोव्हेंबर २०२४ ला आहे, मतदारांना कोणत्याही प्रकारचा त्रास नको व्हायला यासाठी १२ प्रकारचे पुरावे ग्राह्य धरण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या मतदारांचे नाव मतदार यादी मध्ये आहे अशा मतदारांनी मत करण्याकरिता १२ पुराव्यापैकी कोणत्याही एक पुरावा दाखविला तरी त्यांना मतदान करता येईल.
मिळालेल्या माहितीनुसार, ज्या मतदाराजवळ मतदार ओळखपत्र आहे त्यांना मतदान करता येईलच, मात्र ज्या मतदारांचे नाव मतदार यादी मध्ये असून त्यांचे मतदानाचे ओळखपत्र बनलेले नाही अशा मतदारांसाठी निवडणूक कार्यालयाने १२ प्रकारचे पुरावे काढले आहे ते पुरावे पुढीलप्रमाणे,
१२ पुरावे
१) आधार कार्ड
२) पॅन कार्ड
३) पासपोर्ट
४) मनरेगा करून मिळालेले जॉब कार्ड
५) कामगार मंत्रालयाने दिलेले आरोग्य विमा कार्ड
६) दिव्यांगासाठी केंद्र सरकारने दिलेले ओळखपत्र
७) ड्रायव्हिंग लायसन्स
८) बँक पासबुक
९) केंद्र व राज्यात सदस्य असलेल्यांना तिथून मिळालेले ओळखपत्र
१०) जनगणना विभागामार्फत दिलेले स्मार्ट कार्ड
११) कंपनीकडून कर्मचाऱ्यांना दिलेले ओळखपत्र
१२) निवृत्ती वेतनाचे दस्तऐवज
एवढे १२ पुराव्या मार्फत तुम्हाला मतदान करता येईल एखाद्या मतदात्याने आपला पत्ता बदलविला असेल व त्याचे नवीन मतदान ओळखपत्र बनायचे असेल तेव्हा त्याला जुन्या ओळखपत्रावर मतदान करता येईल, मात्र त्या मतदात्याचे नाव बदललेल्या पत्त्यासह मतदार यादीमध्ये असणे आवश्यक आहे.