चंद्रपूर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांनी निर्भयपणे मतदान करावे, असे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे . ही निवडणुक
शांततेत पार पडावी, यासाठी खबरदारी म्हणून चंद्रपूर शहर पोलिसांनी तब्बल १०० सराईत गुन्हेगारांना स्थानबद्ध केले आहे.
जिल्ह्यात कोणतीही बेकायदेशीर गोष्ट घडू नये, यासाठी पोलिस प्रशासनाकडून काळजी घेतली जात असल्याचे पोलिस प्रशासनाचे म्हणणे आहे. दरम्यान, जिल्ह्यातील सहा विधानसभा क्षेत्रांतील मतदान केंद्रांमध्ये निवडणूक शांततेत पार पडावी, यासाठी जिल्हा पोलिस प्रशासन सतर्क मोडवर आहे.आचारसंहिता लागू झाल्यानंतर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांकडून अनेक मोहिमा राबवण्यात आल्या आहे . सार्वजनिक शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावर कारवाई सुरू आहे.
मतदानादरम्यान आपापसांत भांडण लावून देणे, हाणामारी करणे, प्रक्षोपक भाषण करून कायदा व सुव्यवस्था बिघडवणे यांसारख्या घटनांना आळा घालण्यासाठी आचारसंहिता लागू झाल्यापासून पोलिस सतर्क मोडवर आहेत.याचाच भाग म्हणून चंद्रपूर शहर पोलिसांनी विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल असलेल्या १०० सराईत गुन्हेगारांना स्थानबद्ध करण्यात आले आहे .
स्थानबद्धची कारवाई पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलिस अधीक्षक रीना जनबंधू उपविभागीय पोलिस अधिकारी सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनात शहर ठाण्याच्या पोलिस निरीक्षक प्रभावती एकुरके यांनी केली आहे .
स्थानबद्ध झालेल्या आरोपींवर हाणामारी, विनाकारण भांडण लावणे, मालमत्ता, अपहरण, अवैध दारूविक्रीचे गुन्हे दाखल आहेत. पोलिसांच्या रेकॉर्डवरील या १०० सराईत गुन्हेगारांना १६३ (२) बी.एन.एस.एस.अन्वये स्थानबद्ध करण्याचा प्रस्ताव विशेष कार्यकारी दंडाधिकारी तथा अपर पोलिस अधीक्षक कार्यालय चंद्रपूर येथे प्रस्ताव पाठविण्यात आला होता. या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. या गुन्हेगारांना १८ ते २० नोव्हेंबर २०२४ पर्यंत तीन दिवस स्थानबद्ध करण्याचा आदेश जारी करण्यात आला.
अमरावती:- तरुणाने मुलीशी लग्न जोडुन कुटुंबियांना सांगितले की मला मुलीशी एकट्यात बोलायचे आहे, व तो…
अमरावती :- २५ वर्षीय तरुणीवर वारंवार दोन व्यक्तींनी अत्याचार केला, आक्षेपार्ह फोटो व्हिडिओ व्हायरल करण्याची…
बुलढाणा:- मारहाण करून अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस ४ वर्षाचा कारावास व ११ हजार रुपये…
अकोला:- कचरा व्यवस्थापनासाठी घराघरांवर शहरात क्युआर कोड लावले या कोडचा वापर शहरातील घरामधील कचरा नियमित…
अमरावती:- रेशनच्या ई - केवायसीसाठी ३१ डिसेंबर पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे, सार्वजनिक प्रणाली अंतर्गत रेशनकार्ड…
यवतमाळ :- मानसिक विकलांग बालकावर अत्याचार करणाऱ्या आरोपींना ५ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे,…
This website uses cookies.