भंडारा : निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदाच दिव्यांग मतदारांना आणि ८५ वर्षांहून अधिक मतदारांना गृह मतदानाचा हक्क उपलब्ध करून दिला आहे . यात साकोलीत ४१४ तर तुमसरात ४१६ वृद्ध मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.त्यानुसार भंडारा जिल्ह्यातील साकोली व तुमसर विधानसभा मतदारसंघात ७ ते ९ नोव्हेंबर रोजी मतदारांनी गृह मतदान करत मतदानात हक्क बजावला आहे .
आयोगाच्यावतीने विधानसभेसाठी पहिल्यांदाच गृह मतदान हा उपक्रम घेण्यात आले आहेत . त्यात जिल्ह्यातील मतदारांनी सक्रिय सहभाग घेतला आहे .जिल्ह्यात गृह मतदानासाठी नोडल अधिकारी म्हणून उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयप्रकाश परब व सहायक नोडल अधिकारी मुख्याधिकारी भंडारा करणकुमार चव्हाण आहेत. साकोली व तुमसर विधानसभेत गृह मतदान पूर्ण झाले असून, भंडारा विधानसभेसाठी आज ही प्रक्रिया होत आहे. ८५ वर्षांहून अधिक वयोगटातील ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग मतदारांना घरपोच मतदानाची सुविधेचा लाभ यावेळेस घेता येईल.
तसेच दिव्यांग बंधू-भगिनींनीसुद्धा मतदानाचा हक्क नोंदवला. यावेळी गृह मतदान करताना आयोगाने दिलेले सूचनांचे पालन नियुक्त अधिकारी- कर्मचाऱ्यांनी केले.
तुमसरमध्ये एकूण ४३६ मतदारांपैकी ४१६ मतदारांनी गृह मतदानाचा हक्क बजावला. त्यामध्ये ८५ वर्षांहून अधिक वयोगटातील ज्येष्ठ नागरिक ३१६ पैकी ३०४ मतदारांनी मतदान केले. १२० दिव्यांग मतदारांपैकी ११२ जणांनी मतदान केले. साकोली मतदारसंघात एकूण ४३४ मतदारांपैकी ४१४ मतदारांनी मतदान केले. त्यामध्ये ८५ वर्षांहून अधिक वयोगटातील ज्येष्ठ नागरिक ३०६ पैकी २९० मतदारांनी मतदान केले.१२८ दिव्यांग मतदारांपैकी १२४ मतदारांनी मतदान केले आहे .
भंडारा विधानसभा मतदारसंघासाठी एकूण ५०५ मतदारांपैकी ४४९ मतदान झाले असून, त्यामध्ये ८५ वर्षांहून अधिक वयोगटातील ज्येष्ठ नागरिक ४२३ पैकी ३७७ मतदारांनी मतदान केले. ८२ दिव्यांग मतदारांपैकी ७२
मतदारांनी मतदान केले आहे.
अमरावती:- तरुणाने मुलीशी लग्न जोडुन कुटुंबियांना सांगितले की मला मुलीशी एकट्यात बोलायचे आहे, व तो…
अमरावती :- २५ वर्षीय तरुणीवर वारंवार दोन व्यक्तींनी अत्याचार केला, आक्षेपार्ह फोटो व्हिडिओ व्हायरल करण्याची…
बुलढाणा:- मारहाण करून अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस ४ वर्षाचा कारावास व ११ हजार रुपये…
अकोला:- कचरा व्यवस्थापनासाठी घराघरांवर शहरात क्युआर कोड लावले या कोडचा वापर शहरातील घरामधील कचरा नियमित…
अमरावती:- रेशनच्या ई - केवायसीसाठी ३१ डिसेंबर पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे, सार्वजनिक प्रणाली अंतर्गत रेशनकार्ड…
यवतमाळ :- मानसिक विकलांग बालकावर अत्याचार करणाऱ्या आरोपींना ५ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे,…
This website uses cookies.