चंद्रपूर येथील नेरी परिसरातील पांढरवाणी शेतशिवारात ॲल्युमिनियमच्या ताराची चोरी झाली. ही खळबळक जनक घटना शनिवारी निदर्शनास आली. शनिवारच्या रात्री अज्ञात चोरट्यांनी वीज पुरवठा खंडित करून वीज पुरवठा संचापासून ते शेतपंपापर्यंत तेरा ते चौदा खांबावरील चार पदरी अल्यूमिनियम तारांची चोरी केली.
यात चोरी करताना शेतातील दोन पोलसुद्धा पाडले आहे.त्यामुळे पिकांनापाणि देण्याच्या वेळेस, पाणी द्यायचे कसे हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीला चोरीसंदर्भात माहिती दिली. त्यानंतर कंपनीने अज्ञात चोरट्यांविरुद्ध पोलिस स्टेशनमध्ये तक्रार देण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. यासंदर्भात वीज कंपनीचे कनिष्ठ अभियंता मुक्कादम यांना विचरले असता पोलिसात तक्रार करणार असल्याचे सांगितले.
पांढरवाणी शेत शिवारातील संजय घुटके, घनश्याम वाघमारे, गजभे व जरी येथील पठाण या शेतकयांच्या शेतपंपांना वीज जोडणी करण्यात आली होती. मात्र अज्ञात चोरट्यांनी तारांची चोरी केल्याने आता सिंचनाचा प्रश्न उभा झाला आहे.
नेरी परिसरातील पांढरवाणी शेतशिवारात अज्ञात चोरट्यांनी चक्क वीज पुरवठा खंडित करून वीज पोलवरील अल्युमिनियमची तार चोरून नेली. ही या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. नेरी जवळील पांढरवाणी शेतशिवारात शेतीला वीज पुरवठा करण्यासाठी वीज जोडणी करण्यात आली आहे. विद्युत संचापासून तीन ते चार शेत पंपांना वीज जोडणी करण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांना सिंचन करणे सोयीचे झाले होते. वीज तारा चोरी करणान्यांचे मोठे आहे असावे, असा अंदाज शेतकयांनी व्यक्त केला आहे.