अकोला:- कायदा कधीही आंधळा नसतो आधी न्यायालयामध्ये, सिनेमांमध्ये डोळ्यावर पट्टी बांधलेली न्यायदेवतेची मूर्ती सर्वांना माहिती आहे.मिळालेल्या माहितीनुसार, सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी नवीन न्यायदेवतेची मूर्ती बनविण्याच्या ऑर्डर दिला.
ही नवीन मूर्ती पूर्ण पांढऱ्या रंगाची आहे , व या न्यायदेवतेला भारतीय वेशभूषेमध्ये दाखविण्यात आले आहे. डोक्यावर सुंदर मुकुट, कपाळावर टिकली, कानात आणि गळ्यात पारंपारिक आभूषणे आहेत. या न्यायदेवतेच्या एका हातात तराजू आणि दुसऱ्या हातात संविधान पकडल्याचे दिसत आहे,
व डोळ्यावरील पट्टी काढलेली आहे. जुन्या मूर्तीमध्ये एका हातात तराजू व दुसऱ्या हातात तलवार होती, इंग्रजांच्या काळापासून ही परंपरा सुरू होती ती बदलायला हवी. कायदा कधीही आंधळा नसतो तो सर्वांना समान बघतो हे दाखवणे गरजेचे होते.