पालांदूर: भंडारा जिल्ह्यात पट्टीदार वाघीण जंगलाच्या परिसरात फिरत असते . वनविभागाला ही वाघीण परिचित आहे. तिला दोन बछडे आहेत . मिळालेल्या माहितीनुसार कोका, रावणवाडी व किटाडी, मांगली परिसरात ती गेल्या दहा वर्षांपासून फिरत आहे. आजपर्यंत तिने जिवीतहानी केलेली नाही. यापूर्वी सुद्धा जंगल परिसरातील नागरिकांनी वाघीणीसह तिच्या बछड्यांना अनेकदा बघितले आहे. मंगळवारी एका घटनेत वाघिणीने गायीची शिकार केली होती .
अमर ठवरे (किटाडी) असे पशू मालकाचे नाव आहे. वनविभागाने घटनेचा पंचनामा करून नोंद घेतली आहे. घटनेची माहिती वनविभागाला मिळताच अधिकाऱ्यांचे पथक घटनास्थळी पोहचले. बुधवारी सकाळी त्याच शिकार स्थळी वाघिणीचा एक बछडा आला असता वनविभागाने कॅमेऱ्यात कैद केला. उपवनसंरक्षक राहुल गवई, वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक येवतकर, क्षेत्र सहाय्यक मुकेश श्यामकुवर, बीट रक्षक नितीन पारधी, गायकवाड, रंगारी, देशमुख, शहारे व वनमजूर घटनेवर लक्ष ठेवून आहेत. त्यानंतर काही वेळाने तिने बछड्यांना शिकार स्थळी आणले.
यादरम्यान, किटाडी मांगली या जंगलव्याप्त परिसरात पट्टेदार वाघीण व तिचे दोन छावे फिरत असल्याचे शेतकऱ्यांनी पाहिले. यामुळे परिसरात मोठी दहशत पसरली आहे. मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास वाघिणीने तलावाच्या काठावर गायीची शिकार केली होती.यामुळे पुन्हा दहशत पसरली असून, वनविभाग वाघिणीच्या हालचालींवर लक्ष ठेवत आहेत.
परिसरातील गावकऱ्यांनी सावधानगिरी बाळगावी .व वन्यप्राण्यांना त्रास होईल, असे कोणतेही कृत्य करू नये, अशा सूचना वनविभागाने केल्या आहेत. जंगल परिसरात वाघ बघण्यासाठी धाडसी साहस करू नये. वाघाचे छावे त्रस्त होऊन हिंसक होऊ शकतात, असेही सुचविले आहे.
गडचिरोली : या जिल्ह्यात हत्तींचा कळप पाल नदी ओलांडून देलोडाच्या जंगलात दाखल झाला आहे.देलोडा व…
यवतमाळ :- गुरुवारला रात्री ८ लाखाचा दारूसाठा जप्त करून आरोपीवर कारवाई करण्यात आली, विधानसभा निवडणुकीच्या…
अकोला:- वर्धेत एका प्रकरणात १८ वर्षाखाली पत्नी सोबत शरीर संबंध ठेवणे हे बलात्कार ठरते, असे…
वाशिम :- मागील अनेक दिवसांपासून फसवणूक करणाऱ्या लिंक फॉरवर्ड होत आहे, ज्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात…
चंद्रपूर : पूर्वीच्या काळात प्रचार करताना ताई, माई, अक्का, विचार करा पक्का ,अन् या चिन्हावर…
वर्धा :- प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान करून बेकायदेशीर गर्भपात करणे कायद्याने गुन्हा आहे. तिरिही मुलाच्या हव्यासापोटी…
This website uses cookies.