अकोला:- परवाना जिल्ह्यामध्ये शनिवारला एका अल्पवयीन १० वर्षाच्या मुलीचा मृतदेह आढळून आला. मुलीच्या कुटुंबियांनी आरोप केला की तक्रार दाखल केली असता पोलिसांना एफआयआर मध्ये, रूपांतर करण्यास नकार दिला.आणि केलेल्या तक्रारीवर त्वरित कार्यवाही केली नाही ,म्हणून तिथे स्थानिक रहिवाशांनी पोलीस चौकी जाळली.
व उभ्या असलेल्या वाहनांची तोडफोड केली, ग्रामस्थ म्हणतात की हे मुलगी शुक्रवारला संध्याकाळपासून लापत्ता होती.या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. चौकी जाळल्यामुळे पोलिसांना परिसर सोडणे भाग पडले, व त्यानंतर त्या ठिकाणी मोठ्या संख्येने पोलिसांना पाठविण्यात आले व आंदोलकांना शांत केले. पोलिसांनी सांगितले की, बलात्कार व हत्याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली.