चंद्रपूर :या जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यात अनेक गावांत परतीच्या पावसाने झोडपल्यामुळे ,पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. यात कर्ज काढून शेती करणाऱ्या शेतकऱ्यांवर नैसर्गिक संकट ओढवले आहे .सध्या धानाची कापणी सुरू झाली आहे .आणि जडधान अजूनही पूर्ण परिपक्व झालेली नाहीत .यंदा पावसाची साथ चांगली होती .परंतु अवकाळी पाऊस आल्याने शेतकऱ्यांवर संकट कोसळले आहे .
यात कापणीला आलेल्या सोयाबीन व उडिदचे पण मोठे नुकसान झाले आहे .दिवाळी काही दिवसांवर असताना हे संकट ओढवल्याने शेतकऱ्यांनी कर्जाचा भरणा भरायचा कसा ?हा प्रश्न निर्माण झाला आहे .
काही शेतकऱ्यांना त्यापूर्वीच्याच नुकसानीची भरपाई मिळाली नाही, त्यातच हे संकट ओढवल्याने शेतकऱ्यांवर कर्जाचा बोजा वाढला आहे .दरम्यान
परतीच्या पावसाने गोंडपिपरी तालुक्यातील पिकांचे नुकसान झाल्याची माहिती प्रशासनाला प्राप्त झाली.
त्यानुसार, नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले. शेतकऱ्यांनी प्रशासनाला सहकार्य करावे लवकरच पंचनामा सुरू केल्या जाईल, अशी माहिती कृषी अधिकारी सचिन पानसरे यांनी दिली आहे.