Send News on +91 - 92090 51524
More
    HomeGadchiroliपाच नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात पोलिसांना आले यश, यात एक जवान जखमी

    पाच नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात पोलिसांना आले यश, यात एक जवान जखमी

    Published on

    spot_img

    गडचिरोली:या जिल्ह्यामध्ये विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नक्षलवादी घातपात करू शकतात, ही शक्यता पोलिसांनी गृहीत धरली होती .आणि त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात पोलिसांना यश आले आहे.

    छत्तीसगड सीमेवर कोपर्शी जंगलात जोरदार चकमक झाली, यात पाच नक्षलवाद्यांचा खात्मा पोलिसांनी केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार या मृतांमध्ये तीन महिला व दोन पुरुष नक्षलवाद्यांचा समावेश आहे. यात एक जवानही जखमी झाला आहे. या जखमी जवानाला हेलिकॉप्टरने गडचिरोलीत आणले आहे. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

    गडचिरोली पोलिसांनी नक्षलवाद्यांविरोधीत अभियान प्रभावीपणे राबविल्यामुळे नक्षल्यांना हादरा बसला आहे.कारण यात अनेक जहाल नक्षलवादी ठार झाले आहे.तर यात काहींनी शरणागती पत्करली आहे.
    माओवाद्यांविरुद्ध महाराष्ट्रासह छत्तीसगड पोलिसांच्या आक्रमक मोहिमेमुळे नक्षली सैरभैर झाले आहेत. काहींना अटक झाली, तर काही ठार झाले.

    त्यामुळे नक्षली आता नेतृत्वहीन होत आहेत. या पार्श्वभूमीवर छत्तीसगडमधील नक्षली सीमावर्ती भागातील घनदाट जंगलाचा आश्रय घेऊन गडचिरोलीत घुसखोरी करत असल्याचे सांगितले जात आहे.

    Latest articles

    विकलांग बालकावर अत्याचार करणाऱ्यांना पाच वर्षाची शिक्षा

    यवतमाळ :- मानसिक विकलांग बालकावर अत्याचार करणाऱ्या आरोपींना ५ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली...

    मोबाईल बंदी असतांनाही मतदान कक्षात मोबाईल

    बुलढाणा:- विधानसभा निवडणुकीत मोबाईल बंदी असतानाही नागरिकांनी मतदान कक्षात मोबाईल नेऊन व्हीव्हीपॅट वोटिंग मशीनच्या...

    बाजारात सोयाबीनचे दर वाढेना

    वाशिम:- वाशिम मधील बाजारात सोयाबीनचे दर निवडणुकीनंतर वाढतील अशी सर्व शेतकऱ्यांची आशा होती, पण...

    दुचाकी घसरल्यामुळे एक जखमी तर एक ठार

    अमरावती:- २१ नोव्हेंबर रोजी दुचाकी घसरल्यामुळे १ च्या सुमारास खेडनजीक गावातील अपघातात ६४ वर्षीय...

    Read More Articles