Send News on +91 - 92090 51524
More
    HomeAmravatiपाणीपुरवठा योजना ठरणार 'माइलस्टोन' ८६५ कोटींची

    पाणीपुरवठा योजना ठरणार ‘माइलस्टोन’ ८६५ कोटींची

    Published on

    spot_img

    अमरावती: राज्यशासनाने अमृत-२ वाढीव पाणीपुरवठा योजनेअंतर्गत ८६५.२६कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे मुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते महाराष्ट्र जीवन प्राधिकरण तपोवन परिसर येथे या प्रकल्पाचा कोणशीला समारंभ झाला .अमरावतीकडे धरण होते. पण शहराला पाणी पोहोचणारी पाइपलाईन जुनी असल्यामुळे अनेक अडचणी येत असतात. या मिळालेल्या निधीमुळे अमरावतीच्या लोकांचा २४ तास पाणीपुरवठ्याच्या प्रश्न सुटणार असे पवार म्हणाले, या शहराच्या विकासासाठी राज्य शासनाने मोठ्या प्रमाणात निधी दिला. यामुळे शहराच्या पायाभूत सुविधा सुधारणा होतील त्याच दिवशी मुख्यमंत्री अजीत पवारांनी१४२० कोटी रुपयांचे लोकार्पण आणि भूमिपूजन केले. गुरुवारी जिल्हा नियोजनाच्या सभागृहात वेगवेगळ्या कामाचे भूमिपूजन आणि लोकार्पण करण्यात आले. यावेळी आमदार सुलभा खोडके, विभागीय आयुक्त डॉ. निधी पांडे, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, मुख्य कार्यकारी अधिकारी संगीता महापात्र, अतिरिक्त जिल्हा अधिकारी सुरज वाघमारे आणि महापालिका आयुक्त सचिन कलंत्रे उपस्थित होते जिल्ह्याला जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या इमारतीची मागील सात वर्षापासून प्रतीक्षा होती आता ही इमारत रुग्णांच्या सेवेत राहणार आणि असलेल्या जुन्या इमारतीत गर्भवती आणि नवजात राहतील.

    सारथी ला मिळणार ५०० आसान क्षमतेचे श्रोतुगृह

    सरकारला जास्त प्रमाणात उत्पन्न मिळवून देणाऱ्या विभागाकडून मोठ्या प्रमाणात कर गोळा करण्यात येत आहे,व त्या विभागांना चांगल्या सुविधा मिळाव्या म्हणून विकासकामे करताना पुढील काळाचा विचार करण्यात आला आहे. ‘सारथी’ संस्थेमध्ये ३०० बैठक क्षमतेचे श्रोतुगृह मंजूर आहेत .मात्र राज्यातील सर्व सार्थीच्या ठिकाणी ५००क्षमतेची श्रोतुगृह राहणार आहे म्हणून जास्त चा लागणारा निधी देण्यात येणार आहे.

    विभाग स्तरावर असणार क्रीडा सुविधा

    अजित पवारांनी म्हटले, मुलींना मोफत शिक्षण, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, बारावीनंतर विद्या वेतन, शेतकऱ्यांना मोफत वीज ,दुधाला अनुदान, तीन गॅस सिलेंडर तसेच सारथी, बार्टी सारख्या संस्था उभारून अभ्यासासाठी पोषक वातावरण निर्माण करण्यात येत आहे .तसेच विभाग स्तरावर चांगल्या क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार.

    उपमुख्यमंत्र्यांकडून विविध कामाचे उद्घाटन

    उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते ‘सारथी, चे विभागीय कार्यालय, पाणीपुरवठ्याची अमृत योजना, लालखडी रेल्वे उड्डाणपूल, चांगापूर फाटा रस्ता, विभागीय क्रीडा मैदानाचे भूमिपूजन तसेच जिल्हा स्त्री इमारतीचे उद्घाटन करण्यात आले.
    तसेच इमारतीचे नूतनीकरण, विदर्भ ज्ञान -विज्ञान संस्थेतील क्रीडा सुविधा, वडाळी उद्यान सौंदर्यीकरण उत्पादन शुल्क विभागाची इमारत तसेच नगरोत्थान अभियानातील कामांचे ऑनलाईन भूमिपूजनदेखील मुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

    Latest articles

    तरुणाने लग्नापूर्वी ठेवले शरीरसंबंध

    अमरावती:- तरुणाने मुलीशी लग्न जोडुन कुटुंबियांना सांगितले की मला मुलीशी एकट्यात बोलायचे आहे, व...

    तरुणीवर दोघांनी केला अत्याचार

    अमरावती :- २५ वर्षीय तरुणीवर वारंवार दोन व्यक्तींनी अत्याचार केला, आक्षेपार्ह फोटो व्हिडिओ व्हायरल...

    मारहाण करून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

    बुलढाणा:- मारहाण करून अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस ४ वर्षाचा कारावास व ११ हजार...

    घराघरांवर क्युआर कोड लावले

    अकोला:- कचरा व्यवस्थापनासाठी घराघरांवर शहरात क्युआर कोड लावले या कोडचा वापर शहरातील घरामधील कचरा...

    Read More Articles

    तरुणाने लग्नापूर्वी ठेवले शरीरसंबंध

    अमरावती:- तरुणाने मुलीशी लग्न जोडुन कुटुंबियांना सांगितले की मला मुलीशी एकट्यात बोलायचे आहे, व...

    तरुणीवर दोघांनी केला अत्याचार

    अमरावती :- २५ वर्षीय तरुणीवर वारंवार दोन व्यक्तींनी अत्याचार केला, आक्षेपार्ह फोटो व्हिडिओ व्हायरल...

    मारहाण करून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

    बुलढाणा:- मारहाण करून अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस ४ वर्षाचा कारावास व ११ हजार...