वर्धा :- शेतकरी कापूस सोयाबीन, हळद, ऊस असे नगदी पिके घेत असतात, दिवसेंदिवस शेतीचे नुकसानीचे प्रमाण वाढले व महागाई वाढल्यामुळे शेतकऱ्यांच्या तोटा होत आहे. मात्र शेतकऱ्यांनी पारंपारिक शेतीला वळण देत रेशीम शेती करण्याचे ठरवले आहे . हे शेती केल्यामुळे एका वर्षातील ४५ शेतकरयांना नफा होऊन लक्षाधीश झाले. शेतकरयांनी जिल्हामध्ये ३२२ एकरावर रेशीम शेतीची लागवड केली.
मिळालेल्या माहितीनुसार, पारंपारिक शेतीमध्ये पावसाचे अनियमित येणे, हवामानामध्ये बदल, मजूर, बाजारपेठ या सर्व गोष्टीमुळे पारंपारिक शेतीतून पाहिजे तेवढे उत्पन्न मिळत नाही.नगदी पिकांना भाव मिळत नाही पर्यायाने शेतकऱ्यांजवळ दुसरे काहीही उरत नाही म्हणून शेतकऱ्यांनी पारंपारिक शेतीला पूरक रेशीम शेती करण्याचे ठरवले आहे.रेशीम शेतीचे दर दोन महिन्यांमध्ये प्रशिक्षण देण्यासाठी किंवा शेतीसंबंधी अडचण निर्माण झाली , त्याचे मार्गदर्शन केल्या जाते.
जिल्ह्यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी लागवड केली आहे त्यापैकी तीन लाख वर्षाकाठी उत्पन्न घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या ४५ च्या वर आहे. रेशीम शेतीला प्रती क्विंटल ४५ ते ६५ हजार रुपये मिळते, हे पीक फक्त दोन महिन्याचे असते पण यांच्यामधून मोठ्या प्रमाणात नफा होते.