बुलढाणा :- पैशाच्या कारणावरून दोघा भावांमध्ये वाद झाला मोठ्या भावाने सोयाबीन विकून आर्थिक फसवणूक केल्यामुळे वाद झाला. लहान भावाने मोठ्या भावाची हत्या करून खडकपूर्णा नदी पात्रामध्ये ड्रममध्ये मृतदेह भरून फेकून दिले. ही घटना ८ उघडकीस आली या प्रकरणी किनगाव राजा पोलिसांनी लहान भावाला अटक करून सिंदखेडराजा न्यायालयाने लहान भावाला आठ दिवसाची पोलीस कोठडी सजा सुनावली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी लहान भाऊ व मृतक हे नंदना गावातील रहिवासी होते मृताचे नाव अँड. रघुनाथ गवळी व लहान भावाचे नाव नंदू गवळी हा कंटेनर चालक होता. रघुनाथ यांनी सोयाबीन विकली नंदू याचा निदर्शनास आले की रघुनाथने पैशांमध्ये फसवणूक केली,दोघा भावांमध्ये कडाकाचे भांडण झाले.
नंदू गवळी यांने धारदार शस्त्राने रघुनाथ ची हत्या करून त्याला एका ड्रम मध्ये भरल्यानंतर पुण्याला घेऊन जाण्याच्या बहाण्याने ड्रम गावाबाहेर घेऊन गेला गावातीलच व्यक्तींनी ड्रम उचलण्यासाठी मदत केली. नंतर नंदू याने खडकपूर्णा नदी पात्रामध्ये ड्रम टाकला रघुनाथ हा घरी दिसत नसल्यामुळे रघुनाथ च्या पत्नीने पोलिसांना तक्रार केली गावात तपास केल्यानंतर पोलिसांचा संशय नंदू गवळीकडे गेला.
पोलिसांनी संशयावरून नदीपात्रामध्ये ड्रम तपासले असता तिथे मृतदेह आढळून आला, रघुनाथच्या पत्नीने आपला पती असल्याचे ओळखल्यानंतर १० नोव्हेंबरला नंधना गावातून नंदू गवळी याला अटक केली व शिंदखेडराजा न्यायालयाने आठ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.
सोयाबीनच्या पैशाच्या वादातून हत्या
सोयाबीनच्या पैशाच्या वादातून दोघा भावांमध्ये कडाक्याचे भांडण झाले होते, त्यावरूनच नंदू गवळी याने रघुनाथची हत्या केल्याची कबुली पोलिसांना केली या प्रकरणाची पुढील तपास किनगाव ठाण्याचे ठाणेदार करीत आहेत.