भंडारा : या जिल्ह्यातील पोलिओग्रस्त ५५ वर्षीय व्यक्तीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची बातमी समोर आली आहे . ही घटना अड्याळ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नेरला गावात घडली आहे . राजेंद्र रामटेके (५५) असे मृताचे नाव आहे. पोलिओमुळे त्याच्या जीवनात प्रचंड नैराश्य आले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, ७ नोव्हेंबर रोजी दुपारी विश्रांती करत असल्याचे सांगून त्याने खोलीचे दार आतून बंद केले. स्टूल व ड्रमच्या साहाय्याने १० फूट उंचावरील पंख्याला दोरी बांधून गळफास घेतला. ही घटना गुरुवारी दुपारी ४:३० वाजताच्या सुमारास उघडकीस आली.
राजेंद्रला लहानपणापासून पोलिओ झाला होता. या आजारामुळे त्यांचा डावा पाय पूर्णपणे कमकुवत झाला होता. उदरनिर्वाहसाठी तो गवंडीकाम करायचा. काही दिवसांपूर्वी त्याच्या पायाला जखम झाली होती. ती बरीच चिघळल्याने गँगरिन झाले होते. त्यामुळे मोठ्या त्रासातून तो जगत होता. अपंग असल्याने त्यांना शासनाकडून अनुदानही मिळत होते, मात्र पायाच्या जखमेमुळे तो प्रचंड त्रस्त होता. आपण हे दुखणे सहन करू शकणार नाही, असे त्याने एकदा कुटुंबीयांना सांगितलेही होते. या दरम्यान त्याने आत्महत्या केली. यात खोली आतून बंद असल्याने पोलिसांनी मागील खिडकीचे ग्रील तोडून आत प्रवेश केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला . याप्रकरणी एसएचओ धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अड्याळ पोलिस तपास करत आहेत.
अमरावती:- २१ नोव्हेंबर रोजी दुचाकी घसरल्यामुळे १ च्या सुमारास खेडनजीक गावातील अपघातात ६४ वर्षीय इसमाचा…
वर्धा:- सायबर फसवणुकीपासून सावधान रहा असे आवाहन जिल्हा पोलीस व सायबर सेल विभागाने केले आहे,…
चंद्रपूर (सास्ती) : राजुरा तालुका पांढऱ्या सोन्यासाठी प्रसिद्ध आहे.गेल्या काही आठवड्यांपासून जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये मजूर…
अमरावती :- २० नोव्हेंबरला दोनच्या सुमारास ७५ वर्षीय वृद्धाचा मतदान करून घरी परतताना अपघातात मृत्यू…
गोंदिया (अर्जुनी मोरगाव) : घरात पतीचा मृतदेह असतांना, कुटुंबात दुःखाचे सावट सर्वत्र पसरलेले असतांना, जन्मदात्याचे…
वाशिम :- खाजगी बाजारामध्ये पांढरा सोन्याची आवक वाढल्याचे दिसून येत आहे यावर्षी पाऊस चांगल्या प्रमाणात…
This website uses cookies.