लाखांदूर : शेतशिवारात नहर परिसरात काही व्यक्तींनी अवैधरीत्या जुगार भरवून पैशाच्या हार-जितची बाजी लावल्याची बातमी समोर आली आहे . मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी टाकलेल्या धाडीत जुगार खेळणाऱ्या ५ जणांना रंगेहाथ पकडून कारवाई केली आहे .पोलिसांनी दोनाड येथील विकास बगमारे (३०), प्रबुद्ध वैद्य (२४), विकास ठाकरे (३३), संदीप बुरडे (३२) व किरमटी येथील नेपाल केझरकर (३३) नामक आरोपींविरोधात गुन्हा दाखल करून १ लाख १७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ नोव्हेंबर रोजी रात्री ७:३० वाजताच्या सुमारास तालुक्यातील किरमटी येथे घडली.
या आरोपींनी किरमटी गावालगतच्या शेतशिवारात अवैधरीत्या जुगार भरविला होता. गोपनीय माहितीवरून ठाणेदार सचिन पवार यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक परमेश्वर आगाशे, पोलिस नाईक सुभाष शहारे, पोलिस अंमलदार नीलेश चव्हाण, ओमकार सपाटे आदी
पोलिस कर्मचाऱ्यांनी जुगार अड्ड्यावर धाड टाकली असता . या कारवाईत ४ दुचाकी आणि रोख असा एकूण १ लाख १७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पालांदूर येथेसुध्दा विनापरवाना देशी दारूची वाहतूक करताना पालांदूर पोलिसांनी कारवाई केली. कापडी पिशवीमध्ये असलेले १४ पव्वे पोलिसांनी जप्त केले आहे. याप्रकरणी राजेश रामचंद्र बावनकुळे (४८, रा. मुरमाडी तुपकर) याच्याविरुद्ध पोलिसांनी कारवाई केली आहे . पोलिस शिपाई नावेद पठाण यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविण्यात आला. तपास हवालदार धांडे करीत आहेत.
गडचिरोली : आधारभूत धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करण्यासाठी मुदत आता एक महिन्याने वाढवण्यात आली…
गोंदिया : पोटच्याच मुलाने आईलाच कुऱ्हाडीने डोक्यात वार करून आईलाच ठार केल्याची बातमी समोर आली…
चंद्रपूर : 'वन नेशन, वन स्टुडंट आयडी' ही योजना राबविण्याचा निर्णय केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने राष्ट्रीय…
यवतमाळ:- २० नोव्हेंबरला मतदान केंद्रावर मोबाईल व स्मार्ट वॉच वापरून जाण्यास बंदी आहे, मतदान करताना…
अकोला :- १५ नोव्हेंबर रोजी बनावट शस्त्र व नकली परवाना देणाऱ्यांचा पर्दाफाश करून ९ जणांना…
गडचिरोली : या जिल्ह्यात हत्तींचा कळप पाल नदी ओलांडून देलोडाच्या जंगलात दाखल झाला आहे.देलोडा व…
This website uses cookies.