Gondia

प्रचार नंतर बघू आधि शेतमाल आणू घरी

गोंदिया : या जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतशी नागरिकांमध्ये उत्सुकता वाढत असून , प्रचाराचा जोरही वाढत आहे.

परंतु ग्रामीण भागात शेतकरी मात्र शेतातील धानाची राशी तयार करण्यात आणि रब्बी हंगामातील तयारी करण्यात व्यस्त आहेत. या प्रचारात उमेदवार व कार्यकर्ते दिवस-रात्र व्यस्त असले, तरी यंदा पाऊसकाळ जास्त झाल्याने शेतकऱ्यांची धानाच्या मळणीची कामे रखडली होती.

शिवाय, शेतात तणाचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढल्याने शेतकऱ्यांना ते काढण्यासाठी खूप आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला व यात वेळही वाया गेला. परतीच्या पावसामुळे शेतशिवारात साचलेल्या पाण्याचा निचरा होत नसल्याने रब्बीची पेरणी खोळंबली. त्यामुळे शेतकऱ्यांना दिवस-रात्र रब्बी पेरणीची चिंता लागून राहिली होती. असे असतानाच दुसरीकडे विधानसभेचा आखाडा पेटला.

विविध राजकीय पक्षांच्या पाण्याचा निचरा होत नसल्याने रब्बीची पेरणी खोळंबली. त्यामुळे शेतकऱ्यांना दिवस-रात्र रब्बी पेरणीची चिंता लागून राहिली होती. असे असतानाच दुसरीकडे विधानसभेचा आखाडा पेटला.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्ष गावागावांत फिरून मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत.

पदाधिकारी, कार्यकर्तेदेखील त्यांच्या परीने प्रचाराची यंत्रणा राबवताना दिसत आहेत. परंतु, शेतकरी मात्र पुढच्या वर्षीच्या उत्पन्नासाठी राबताना दिसून येत आहे. त्यामुळे उमेदवार जरी प्रचारात व्यस्त असले, तरी आधी शेतातील धान व रब्बीची पेरणी करू नंतरच प्रचाराचे बघू, अशा प्रतिक्रिया शेतकरी वर्गातून व ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांकडून व्यक्त केल्या जात आहेत.

प्रचार करण्यासाठी मोजकेच दिवस बाकी :

विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे , आणि २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी आहे. विधानसभा निवडणूक जाहीर होऊन १६ दिवस झाले असून, उमेदवारांकडे प्रचारासाठी आता दोनच दिवस शिल्लक आहेत.

त्यामुळे उमेदवारांसह पदाधिकारी, कार्यकर्ते ग्रामीण भागात मतदारांच्या गाठीभेटी, कॉर्नर बैठका घेत आहेत. मात्र, ग्रामीण भागातील शेतकरी पेरणी व धान मळणीच्या कामात व्यस्त असल्यामुळे त्यांची अडचण होताना दिसत आहे.

Vidarbha Trends Team

Recent Posts

रानटी हत्तीच्या कळपाने प्रवेश केला चुरचुरा परिसरात

गडचिरोली : या जिल्ह्यात हत्तींचा कळप पाल नदी ओलांडून देलोडाच्या जंगलात दाखल झाला आहे.देलोडा व…

1 hour ago

८ लाखाचा दारूसाठा पोलिसांनी जप्त केला

यवतमाळ :- गुरुवारला रात्री ८ लाखाचा दारूसाठा जप्त करून आरोपीवर कारवाई करण्यात आली, विधानसभा निवडणुकीच्या…

2 hours ago

पट्टेदार वाघीण फिरत असल्याने गावकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण

पालांदूर: भंडारा जिल्ह्यात पट्टीदार वाघीण जंगलाच्या परिसरात फिरत असते . वनविभागाला ही वाघीण परिचित आहे.…

3 hours ago

१८ वर्षाखाली पत्नी सोबत संबंध ठेवणे बलात्कारच

अकोला:- वर्धेत एका प्रकरणात १८ वर्षाखाली पत्नी सोबत शरीर संबंध ठेवणे हे बलात्कार ठरते, असे…

3 hours ago

फसवणूक करणाऱ्या लिंकपासून सावध राहा

वाशिम :- मागील अनेक दिवसांपासून फसवणूक करणाऱ्या लिंक फॉरवर्ड होत आहे, ज्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात…

3 hours ago

मतदान यंत्रनेचा झाला उदय,मतदान पेटी झाली कालबाह्य

चंद्रपूर : पूर्वीच्या काळात प्रचार करताना ताई, माई, अक्का, विचार करा पक्का ,अन् या चिन्हावर…

4 hours ago

This website uses cookies.