वाशिम:- वाशिम मधील बाजारात सोयाबीनचे दर निवडणुकीनंतर वाढतील अशी सर्व शेतकऱ्यांची आशा होती, पण निवडणुकीनंतर असे झाले नाही उलट बाजारात सोयाबीनची आवक घटली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, विधानसभा निवडणुक ही २० तारखेला असल्यामुळे जिल्ह्यात २० नोव्हेंबरला सर्वच बाजार समित्या बंद ठेवण्यात आल्या होत्या,
यामुळे बाजार समितीतील कोणताही शेतीमाल विकला गेला नाही. गुरुवारला बाजार समिती पूर्वीप्रमाणे सुरू झाली नागरिकांना निवडणुकीनंतर सोयाबीनचे दर किती वाढते याकडे लक्ष होते, मात्र निवडणुकीनंतरही सोयाबीनचे भाव वाढले नाही व बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक सुद्धा घटली आहे. सोयाबीनला प्रती क्विंटल फक्त ४००० रुपये भाव मिळाला आहे रब्बी हंगामाच्या पेरणीसाठी अनेक शेतकऱ्यांना कमी भावामध्ये सोयाबीन विकावी लागत आहे.
बाजारात समाधानकारक दर न मिळाल्यामुळे सोयाबीन साठवणूक
बाजार समितीत शेतकऱ्यांच्या सोयाबीनला समाधानकारक दर न मिळाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त सोयाबीन साठवणुकीवर भर दिला आहे, तर काही किरकोळ शेतकऱ्यांनी रब्बी हंगामाच्या तयारीसाठी सोयाबीन विकली