वाशिम:- बालवधुशी विवाह करणाऱ्यांना तुरुंग भोगावे लागेल गेल्या मागील वर्षांमध्ये शासनाने १८ बालविवाह रोखले आहेत, जर कोणत्याही व्यक्तीने १८ वर्षाखालील मुलीचे बालविवाह केले तर कायद्यानुसार त्यांना १ लाख रुपये दंड व दोन वर्षाच्या तुरुंगवास भोगावे लागेल. किंवा दोन्ही शिक्षा एका वेळेस होऊ शकतात, म्हणून नागरिकांनी बालविवाह रोखण्यास मदत करावी असे आवाहन प्रशासनाने दिले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १८ वर्षाच्या आत मुलगी व २१ वर्षाच्या आतील मुलाचे लग्न म्हणजे बालविवाह, बालविवाह करणे कायद्याने गुन्हा आहे तुळशी विवाह आटोपल्यानंतर लग्न करण्यास सुरुवात होते. बालविवाह करण्यास सक्त मनाई असल्यामुळे बालविवाह होतांना दिसल्यास थांबवावे.
ग्रामीण भागामध्ये ग्रामसेवक हा बालविवाह प्रतिबंधक अधिकारी असतात .व या बालविवाहामध्ये जे कोणी सामील होईल त्यांनाही अटक करण्यात येईल, यासाठी गुन्हेगारांना एक लाख दंडाचे शिक्षा सुनावण्यात येणार, जन्माची खोटी नोंद दाखवणाऱ्यांना अटक करून शिक्षा दिली जाणार यासाठी या प्रकारचे विवाह रोकण्यास नागरिकांनी मदत करावे असे आवाहन महिला बालकल्याण विभागाने केले आहे.
बालवधुशी विवाह करण्याचे प्रशासनाचे समुपदेशन
बालविवाह होण्याची गोपनीय माहिती मिळाल्यास पोलिसांना कळवावी त्या ठिकाणी चमु उपस्थित झाल्यानंतर ते समुपदेशन करतात, व आई-वडिलांना बालकल्याण समिती समोर हजर करून संरक्षणाच्या दृष्टीने त्यांना मार्गदर्शन करण्यात येईल. या बालविवाहामध्ये फोटोग्राफर, प्रिंटिंग प्रेस, वाजंत्री, आई-वडील, नातेवाईक जे कोणी सहभागी होतील त्यांना अटक करण्यात येईल.