अकोला:- ‘बुद्धभूमी बचाव ‘मोर्चाने आजपर्यंतचे सर्व रेकॉर्ड ब्रेक केले. सोमवारी हा मोर्चा निघाला दीड लाखापेक्षा जास्त बौद्ध अनुयायी मोर्चात सामील झाले. या मोर्चामध्ये सर्व शहर दणाणले होते या जनसमुदायाने शेवटपर्यंत शांती व संयम राखला, बुद्धलेणीच्या पायथ्याशी असलेल्या बुद्धभूमीतील विपश्यना विहार भिक्खुंच्या कुटी व अन्य परिसर गायरान जागेवर आहे .
हा परिसर अतिक्रमण समजून प्रशासनाने नोटीस पाठवला त्यामुळे संतप्त बौद्ध अनुयायींनी भिक्खुसाठी महामोर्चा काढला. दिल्ली गेटच्या समोर विचारमंचावर भदन्त यांनी त्रिशरण पंचशील घेतल्यानंतर मोर्चा काढला, अतिशय शांततेत मोर्चा निघाला कोणते प्रकारचे गालबोट लागणार नाही असे वर्तन केल्यामुळे याबद्दल अनुयायांचे प्रशासनाने आभार व्यक्त केले .हा मोर्चा १२:३० वाजता क्रांतीचौकातून निघाला, यामध्ये महिला ,पुरुष व वृद्ध मोर्चात सहभागी होते.