बुलढाणा:५ ऑक्टोंबर रोजी दारुड्या जन्मदात्या बापाने दोन मुलींना फेकले नदीत, लोणी कदमापूर येथे रहिवासी असलेला शेख हारून हा चार-पाच वर्षापासून सासुरवाडीलाच राहत होता.त्याने मुलीचे आधार कार्ड अपडेट करतो ,असे सांगुन आदिया आणि सदफ या दोन्ही मुलीला घेऊन गेल्याचा आरोप सासऱ्यानी लावला. मिळालेल्या माहितीनुसार ,बुलढाणा मधील हिवरखेड पोलीस स्टेशनमध्ये मुली लापत्ता झाल्याचे तक्रार करण्यात आली.
या तक्रारीमध्ये मुलीच्या वडिलांवर संशय असल्याचे नमूद केले ,म्हणून पोलिसांनी बेपत्ता असलेल्या मुलीच्या वडिलांना अटक केली. पोलिसांनी त्याच्यावर दबाव टाकताच सर्व सांगू लागला. त्याने दोन्ही मुलींना बाळापुरनजीक भिकुंड नदीच्या पात्रामध्ये फेकल्याचे कबूली केली. त्यावेळी पोलिसांनी शोध व बचाव पथकाच्या मदतीने तपास सुरू केली . त्या पात्रामध्ये तपासी दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक व गुन्हे अन्वेषण विभागाचे सर्व अधिकारी उपस्थित होते.