बुलढाणा :- निवडणुकीतील उमेदवार पक्षाच्या खर्चाच्या नोंदीवर नियंत्रण ठेवण्यासाठी निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून भारतीय महसूल सेवेतील अधिकारी दानिश अब्दुल्ला आणि नवनीत कुमार यांची निवड करण्यात आली.त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये २४ ऑक्टोबरला निवडणूक खर्चाविषयीचा आढावा घेतला.मिळालेल्या माहितीनुसार, या बैठकीमध्ये जिल्हा निवडणूक अधिकारी डाॅ. किरण पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक, उपजिल्हाधिकारी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुहासिनी गोणेवार, निवडणूक खर्च विषयक बाबींचे नोडल अधिकारी प्रकाश राठोड, विविध विभागाचे प्रमुख व नोडल सर्व खर्च निरीक्षक उपस्थित होते.
या बैठकीमध्ये निवडणूक तयारीची माहिती निरीक्षकांनी घेतली यामध्ये मतदारसंघ व त्या केंद्राची संख्या त्या ठिकाणी कोणत्या सुविधा असाव्या मतदार संख्या , स्थिर नियंत्रण पथक, भरारी पथक ,ईव्हीएम व व्हीव्हीपॅट ,मनुष्यबळ, प्रशिक्षण कायदा, एसएमएस सेवा इत्यादी बाबीविषयक माहिती देण्यात आली,
निवडणुकीच्या काळात सर्व पक्षाच्या खर्चावर नोंदी ठेवण्याचे निर्देश देण्यात आले या पथकांनी रस्त्यावर तपासणी दरम्यान नाक्यावर पथकांनी काटेकोरपणे काम करावे, उमेदवारांच्या सभा, प्रचार वाहने, प्रचार साहित्य, भोजन जाहिराती, इत्यादी खर्चाची नोंद ठेवावी.कोणते वाहनांमध्ये अवैध रक्कम ने – आन करत असतील तर त्यांच्यावर कारवाई करावी इत्यादी सूचना दिल्या आहेत.