बुलढाणा :- १९ ऑक्टोबरला वरदडी येथे शेतकरी झाडाचे फांदी तोडत असताना फांदी अंगावर पडल्याने शेतकऱ्याच्या जागीची मृत्यू झाला. मृताचे नाव नामदेव आटोडे हा शेतातील मशागत करण्यासाठी शेतात गेला होता. मशागत करताना ट्रॅक्टरला आंब्याच्या झाडाच्या फांद्या लागत होत्या म्हणून नामदेव त्या फांद्या तोडायला गेला, दुपारला त्याने अर्धी फांदी तोडली व झाडावरून खाली आला.
अर्धवट तुटलेली फांदी खिचताच ती अंगावर पडली त्या फांदीखाली दबल्याने शेतकऱ्याच्या जागीच मृत्यू झाला. नामदेव याने ते शेत भाड्याने केले होते त्या शेताचा मालक नेहमीप्रमाणे शेत बघण्यासाठी गेला तेव्हा त्याला नामदेवचा मृतदेह आढळला, शेतमालकानी लगेच पोलिसांना माहिती दिली व पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केली.