बुलढाणा :- मलकापूर येथे नामवंत आरंभ ट्रेडिंग कंपनी शेतकऱ्यांचे शेतमाल घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी तपास गुन्हा शाखेकडे करण्यात आला होता, या शाखेने तपासणी केली असता मोताळा, मलकापूर, नांदुरा येथील ५६ शेतकऱ्यांची २ कोटी ६४ लाख ६१ हजार ७३७ रुपयाची फसवणूक झाल्याची माहित झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, मलकापूर शहरातल्या आरंभ ट्रेडिंग कंपनीने मलकापूर, मोताळा, नांदुरा आणि खानदेशातील काही शेतकऱ्यांना शेतमालाला जास्त भाव देण्याचे आमिष दाखवून शेतमाल खरेदी करून घेतले त्यामध्ये प्रचलित पिके होती कापूस, मका, तूर इत्यादी होते पिके खरेदी केल्यानंतर मोबदल्यामध्ये धनादेश देण्यात आले. पण त्यांना ठरल्याप्रमाणे पैसे न मिळाल्यामुळे प्रल्हाद तायडे यांनी पोलिसात तक्रार केली.
पोलिसांनी तपास करून प्रफुल पाटील, विजय बोरले , प्रवीण महाजन अशा आरोपीवर गुन्हा दाखल केला,यांच्यावर कार्यवाही केल्यानंतर माहित झाले की शेतकऱ्यांची २ कोटी ६४ लाख ६१ हजार ७३७ रुपयाची फसवणूक झाली आहे, पोलिसांनी या घटनेची आणखी तपास करण्याकरिता आर्थिक गुन्हे शाखेला सोपवले असून २३ ऑक्टोंबर रोजी ट्रेडिंग कंपनीकडून ज्या शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे त्या शेतकरयांना कागदपत्रासह उपस्थित राहण्यास सांगितले.