चंद्रपूर : या जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ,वडेटीवारांसह तीन मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार जाहीर झाल्याची बातमी समोर आली आहे .महाविकास आघाडीतील काँग्रेसने 48 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे .यात विदर्भातील सतरा उमेदवार आहेत .तर चंद्रपूर जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघाचा समावेश यात आहे.
त्यामध्ये ब्रह्मपुरीतून विजय वडेट्टीवार यांच्यासह राजुरातून सुभाष धोटे, हे तिसऱ्यांदा, तर चिमूरातून डॉक्टर सतीश वारजुकर ,हे दुसऱ्यांदा, निवडणूक लढवणार आहेत.
यात विशेष म्हणजे चिमुरात सलग दुसऱ्यांदा कीर्ती कुमार भांगडीया आणि डॉक्टर सतीश वारजूकर यांच्यात लढत बघायला मिळणार आहे. तर राजुरा क्षेत्रासाठी काँग्रेसकडून आमदार सुभाष धोटे तसेच स्वातंत्र भारत पक्षाचे माजी आमदार ऍडव्होकेट वामनराव चटप यांनी ,निवडणूक निर्णय अधिकारी रवींद्र माने यांच्याकडे नमांकन दाखल केले आहे.
तर येथे भाजप कोणाला उमेदवारी देते? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत .त्यासोबतच खासदार प्रतिभा धानोरकर यांचे बंधू प्रवीण काकडे यांनी वरोरा विधानसभा क्षेत्रात ,तर चंद्रपूर मतदारसंघात अपक्ष सुरेश पाईकराव यांनी नामांकन अर्ज भरला आहे.
चंद्रपूर : या जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ८५ वर्षीय पूर्ण केलेल्या, तसेच ४० टक्के व…
गोंदिया : या जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. निवडणूक कालावधी पूर्ण होईपर्यंत कोणत्याही…
गडचिरोली : या जिल्ह्यात सेप्टिक टाक्यांची सफाई केल्याचे बिल काढून दिल्याबद्दल पोलिस अधीक्षक कार्यालयातील वरिष्ठ…
यवतमाळ :- यवतमाळ विधानसभा क्षेत्रामध्ये सकाळी ७ वाजता पासून १४ ते १६ नोव्हेंबर पर्यंत ८५…
वर्धा :- शिक्षकाने आईला म्हटले तुमची मुलगी अभ्यासात कच्ची आहे मी तिला दुसऱ्या बॅचमध्ये नेऊन…
अकोला:- शेतकऱ्यांनी रब्बी हंगाम लागल्यामुळे शेतात हरभरा, गहू, मका, बाजरी अशा अनेक पिकाची पेरणी केली…
This website uses cookies.