भंडारा(अड्याळ ): डोक्यावर विटा असलेल्या स्थितीत एका ७० वर्षीय वृद्ध महिलेचा मृतदेह मागे आढळला होता. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती.
त्यामुळे अनुराधा कालीचरण मेश्राम या महिलेचा संशयास्पद मृत्यू झाला.व या मृत्यूमागे घातपात असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे .या महिलेच्या गळ्यात असलेल्या माळेतील आणि कानातील सोन्याचे मणी गायब असल्याचे तपासात आढळून आले.
त्यावरून या मृत्यूमागे घातपात असावा, असा संशय प्राथमिक तपासात व्यक्त होत आहे. पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेऊन तातडीने तपासाला दिशा दिली. श्वानपथकाचाही यात वापर करण्यात आला. मात्र, काहीच माग लागू शकला नाही. दरम्यान, पोलिसांच्या तपासात त्या वृद्ध महिलेच्या गळ्यातील दोन व एका कानातील एक असे तीन सोन्याचे दागिने गायब असल्याचे उघडकीस आले.
प्राप्त माहितीनुसार, ज्या ठिकाणी मृत महिला राहायची त्याच परिसरात गावातीलच काही मंडळी जुगार खेळायला येत होते .या महिलेच्या अंगणात असलेल्या झाडावरील सीताफळ तोडण्यासाठी एक युवक गेला असता ही वृद्ध महिला पडलेली त्याला दिसली. त्याने गावात ही माहिती दिल्यावर ग्रामस्थांनी व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, तेव्हा डोक्यावर विटा पडून असलेल्या स्थितीत ती होती.
अमरावती:- तरुणाने मुलीशी लग्न जोडुन कुटुंबियांना सांगितले की मला मुलीशी एकट्यात बोलायचे आहे, व तो…
अमरावती :- २५ वर्षीय तरुणीवर वारंवार दोन व्यक्तींनी अत्याचार केला, आक्षेपार्ह फोटो व्हिडिओ व्हायरल करण्याची…
बुलढाणा:- मारहाण करून अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस ४ वर्षाचा कारावास व ११ हजार रुपये…
अकोला:- कचरा व्यवस्थापनासाठी घराघरांवर शहरात क्युआर कोड लावले या कोडचा वापर शहरातील घरामधील कचरा नियमित…
अमरावती:- रेशनच्या ई - केवायसीसाठी ३१ डिसेंबर पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे, सार्वजनिक प्रणाली अंतर्गत रेशनकार्ड…
यवतमाळ :- मानसिक विकलांग बालकावर अत्याचार करणाऱ्या आरोपींना ५ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे,…
This website uses cookies.